High Blood Pressure saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure: रक्तदाब वाढण्यामागे फक्त मीठच नाही, या ६ चुका रोज करत असाल तर हृदयावर वाढतो मोठा ताण

Hypertension: मीठ कमी करूनही रक्तदाब नियंत्रणात येत नसेल तर त्यामागे ताण, अपुरी झोप, हार्मोन्समधील बदल, काही औषधं, पोटाभोवतीची चरबी आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांसारखी कारणं असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

उच्च रक्तदाब म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी मीठ येतं. त्यामुळे अनेक जण जेवणातील मीठ कमी करतात. पण तरीही काही लोकांचा रक्तदाब नियंत्रणात येत नाही. कारण हाय बीपी होण्यामागे फक्त मीठच जबाबदार नसतं. आपल्या रोजच्या सवयी, काही आजार आणि इतर अनेक कारणांमुळेही रक्तदाब वाढू शकतो.

अशा काही गोष्टी आहेत द्या तुमचा रक्तदाब वाढवतात. या गोष्टी नकळत आपल्याकडून घडतात आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. या समस्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

सततचा ताणही वाढवू शकतो रक्तदाब

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण कायम तणावाखाली असतात. शरीरावर सतत मानसिक ताण आला की कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन हे स्ट्रेस हार्मोन्स वारंवार वाढतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. याचा परिणाम म्हणजे हळूहळू रक्तदाब वाढू लागतो.

अपुरी झोपही ठरतं मोठं कारण

रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या किंवा स्लीप अॅपनियासारख्या झोपेच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्येही रक्तदान वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आहार चांगला असूनही बीपी नियंत्रणात येत नाही.

हार्मोन्समधील बदल

शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यास त्याचाही रक्तदाबावर परिणाम होतो. थायरॉईडचे विकार, अॅड्रिनल ग्रंथीचे आजार किंवा महिलांमध्ये पीसीओएस (PCOS) असल्यास रक्तदाब वाढू शकतो. काही लोकांमध्ये तर जीवनशैलीपेक्षा हार्मोन्समधील बदल हेच हाय बीपीचं मुख्य कारण असतं. त्यामुळे रक्तदाब सतत जास्त राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये किंवा फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये.

काही औषधांमुळेही वाढू शकतो बीपी

आपण नियमित घेत असलेल्या काही औषधांचाही रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. पेनकिलर गोळ्या, स्टिरॉइड्स, सर्दीसाठी वापरले जाणारे नाकातील डिकंजेस्टंट्स, गर्भनिरोधक गोळ्या तसंच काही हर्बल सप्लिमेंट्स यामुळेही रक्तदाब वाढू शकतो.

पोटाभोवती वाढलेली चरबी धोकादायक

वजन वाढणं विशेषतः पोटाभोवती चरबी साचणं ब्लड प्रेशरसाठी घातक ठरतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्रतिकार वाढतो आणि शरीर इन्सुलिनचा वापर योग्य प्रकारे करू शकत नाही. याशिवाय मधुमेह आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात नसेल तर हळूहळू रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि रक्तप्रवाहावर परिणाम होऊन रक्तदाब वाढतो.

शरीरात पाण्याची कमतरता

अनेक जण पुरेसं पाणी पित नाहीत. शरीरात पाण्याची कमतरता झाली की सोडियमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयाला अधिक ताकदीने रक्त पंप करावं लागतं आणि रक्तदाब वाढू शकतो. तसंच आहारातून पोटॅशियम कमी प्रमाणात मिळत असेल तरी शरीरातील रक्तदाबाचं नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT