Disadvantage Of marrying Rich Men  Saam Tv
लाईफस्टाईल

Disadvantage Of Marrying Rich Men: श्रीमंत माणसासोबत वैवाहिक जीवन घालवणे अधिक कठीण ! असा जोडीदार निवडण्यापूर्वी नक्की विचार करा

Marriage Tips : अगदी आपल्या मुलीला सुखी व अधिक श्रीमंत नवरा शोधून देण्याचे काम प्रत्येक आई-वडील करत असतात.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : हल्ली लग्न करताना मुली किंवा त्याच्या कुटुंबाला अधिक श्रीमंत मुलगा हवा असतो. ज्याचे स्वत:चे घर असेल. अगदी आपल्या मुलीला सुखी व अधिक श्रीमंत नवरा शोधून देण्याचे काम प्रत्येक आई-वडील करत असतात.

सगळी नाती (Relationship) ही पैशांनी खरेदी करता येत नाही. कुठलेच नातं हे पैशांवर टिकत नाही. सध्याच्या काळात पैसा हा अधिक महत्त्वाचा असला तरी पैशांमुळे कोणतेच नाते अधिक काळ टिकत नाही. दोन व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल भावना नसतील तर ते नाते फुलणे अधिक कठीण असते. कधी कधी पैशांमुळे अनेक विवाहात (Marriage) पेच पाहायला मिळतात.

प्रेमाने पोट भरत नाही असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. पण केवळ पैसाच तुमचे जीवन आनंददायी करु शकते असे म्हणणे देखील चुकीचे आहे. आजकाल मुली आपला जोडीदार निवडताना मुलांची सामाजिक व आर्थिक स्थितीला महत्त्व देतात. इतकंच नाही तर अनेक वेळा श्रीमंत नवरा मिळवण्याच्या हव्यासापोटी ती अशा व्यक्तीला दुरावतात, जो तिच्यावर खूप प्रेम करतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी श्रीमंत (Rich) नवऱ्याच्या शोधात असाल तर अशा व्यक्तीसोबत नातेसंबंधात राहण्याचे तोटे देखील जाणून घ्या

1. मिळेल दुय्यम स्थान

जर तुम्ही श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न करताय तर तुम्ही त्याची पहिली प्राथमिकता कधीच नसाल हे लक्षात ठेवा. अशा व्यक्तींना नेहमी आपले काम हे आधी असते. अशी माणसं घरी कमी व कामात स्वत:ला अधिक झोकावून देतात.

2. नात्यात प्रेमापेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा

प्रत्येक महिलेला तिच्या नात्यात गोडवा हवा असतो. परंतु, श्रीमंत असणाऱ्या माणसाला पैशांपुढे कोणतीच गोष्ट दिसत नाही. ते आपल्या पत्नीसोबत वेळ न घालवता महागडे गिफ्ट ऑफर करतात.

3. सुख-सुविधेसोबत एकटेपणा

श्रीमंत पतीशी लग्न केल्यानंतर , तुम्हाला त्या सर्व सुखसोयी मिळू शकतात पण त्याचासोबत वेळ घालवता येणार नाही. त्याच्या बिझी शेड्युलमुळे अनेकवेळा रात्रीचे जेवण, शॉपिंग एकट्याने करावे लागते.

4. इनसिक्युरीटी

श्रीमंत माणसाला दिशाभूल करण्याच्या सर्व संधी उपलब्ध असतात. कारण तो घरी बायको आणि मुलांसोबत कमी वेळ घालवतो आणि ऑफिसमधल्या लोकांच्या सहवासात जास्त वेळ घालवतो, जिथे इतर स्त्रियाही असतात. अशा स्थितीत तुमच्या श्रीमंत नवऱ्यामुळे तुम्हाला नेहमीच असुरक्षित वाटू शकते. त्याचे बाहेर अफेअर असण्याचीही दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

रत्नागिरीत थरारक अपघात! पोलीस गाडीला चिरडत २२ चाकांचा महाकाय कंटेनर दरीत; एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: Mumbai: नरभक्षक बिबट्याचा महिलेवर हल्ला; हल्ल्यात महिलेचा बळी

विद्यार्थ्यांसाठी १२८ दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन जाहीर; 16 दिवसांची दिवाळीची सुट्टी; 24 नोव्हेंबरला ही सुट्टी

SCROLL FOR NEXT