Relationship Tips saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलतोय? 'या' सोप्या टीप्सने तुम्ही पकडू शकता खोट्या गोष्टी

Surabhi Jagdish

योग्य वयामध्ये रिलेशनशिपचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आजकाल आपण अनेक असे कपल्स पाहतो, ज्यांच्यामध्ये भांडणं होतात. कधी-कधी ही भांडणं फार छोटी असतात मात्र अनेकदा ही भांडणं टोकाचा निर्णय घेतात. रिलेशनशिपमधील ही भांडणं टोकाचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे पार्टनरचं खोटं बोलणं.

एकदा खोटं बोलल्याने व्यक्ती त्याच्या पार्टनरवर संशय घेऊ लागतो. ज्यावेळी एखाद्या नात्यामध्ये विश्वासाची कमतरता असते, तेव्हा खोट बोलण्याची वेळ येऊ शकते. मात्र तुमचा अनेकदा पुरावा नसल्याने पार्टनरला काहीही बोलणं देखील योग्य वाटत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलतोय तर तुम्ही या टीप्सने सत्यता जाणून घेऊ शकता.

बॉडी लँग्वेजवर लक्ष द्या

आपलं आपल्या जोडीदाराकडे लक्ष असतं. मात्र जर तुमचा पार्टनर खोटं बोलतोय असा तुम्हाला संशय असेल तर पार्टनरच्या दैनंदिन कामांकडे लक्ष द्या. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भावना आणि हावभाव ते काय विचार करत आहेत हे सांगू शकतात. जर तो अचानक शांत झाला किंवा तुमच्या प्रश्नांच्या उत्तरात मस्तरीत घेऊ लागला तर तो खोटे बोलतोय असं तुम्ही समजू शकता.

घाम फुटणं

अनेकांना खोटं बोलताना घाम फुटतो. त्यामुळे जर तुमचा पार्टनर काही बोलण्यास घाबरत असेल किंवा त्याचा आवाज थरथरत असेल तर समजून घ्या की तो खोट बोलतोय. अशा वेळी तुमच्या पार्टनरला घाम येणं सामान्य आहे.

राग येणं

ज्या व्यक्ती खोटं बोलतात ते अनेकदा त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आवाज उठवतात. अनेकदा त्यांच्या मुद्द्यासाठी ते भांडण देखील करतात. तो कोणत्याही कारणाशिवाय रागावतात ज्यामुळे तुमच्यावर त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडतो. तुमच्या जोडीदाराला विनाकारण राग येत असेल तर तो खोटं बोलतोय असं समजू शकता.

नजर

जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलत असताना तुमच्याकडे पाहत नाही किंवा दूर पाहतो तेव्हा तो तुमच्याशी खोटे बोलत असतो. असे लोक सहसा खोटं बोलताना दुसरीकडे किंवा इतर गोष्टींकडे पाहून बोलतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP : राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतीकारांनी बाबा सिद्धिकींना वाहिली श्रद्धांजली

IND W vs AUS W: हरमनप्रीत एकटी लढली! सामना निसटला, मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी; पाहा समीकरण

Dombivli Politics: डोंबिवलीत ठाकरे गट - भाजपमध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Funeral: बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये जरांगे-भुजबळ समर्थक आमनेसामने

SCROLL FOR NEXT