Worms in Children Stomach Saam Tv
लाईफस्टाईल

Worms in Children Stomach : तुमच्या बाळाच्या पोटात दुखतय ? कसे ओळखाल ? जाणून घ्या

पोटात जंत वाढल्यामूळे, बाळाचे पचन आणि आरोग्य दोन्हीवर वाईट परिणाम होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Worms in Children Stomach : मुलांमध्ये पोटदुखीचे पहिले कारण त्यांच्या पोटातील कृमी असू शकते.पोटात जंत असल्याने मुलांचा शारीरिक विकासच नव्हे तर मानसिक विकासही खुंटतो.पोटात आढळणारे हे कृमी किंवा जंत प्रजनन प्रक्रियेनंतर आतड्यांमध्ये अंडी घालतात. पोटात त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे, बाळाचे (Baby) पचन आणि आरोग्य दोन्हीवर वाईट परिणाम होतो, जे नंतर त्यांच्या पोटशूळचे कारण बनते.जर तुमच्या मुलालाही पोटदुखीची वारंवार तक्रार होत असेल तर ही लक्षणे पाहून त्याच्या पोटात जंत आहेत की नाही हे ओळखा. (Health)

पोटात कृमी होण्याची कारणे -

संसर्गग्रस्त खाद्यपदार्थांचे सेवन, घराभोवतीची घाण, कमी शिजवलेले अन्न खाणे इत्यादींमुळे पोटात जंत होतात.

स्टूलला घाणेरडा वास येणे -

जर तुमच्या मुलाच्या स्टूलला विचित्र वास येत असेल तर ते सामान्य नाही. त्याच्या पोटात एक प्रकारचा संसर्ग होऊ शकतो.

गुदद्वाराभोवती खाज येणे -

सकाळी हे कृमी गुदद्वाराजवळ पोहोचतात, त्यामुळे मुलांना गुदद्वाराभोवती खाज सुटणे किंवा अस्वस्थता येते.लहान मुले या खाजमुळे त्रस्त होतात आणि अनेक वेळा रडू लागतात.

झोपताना अस्वस्थता -

जर तुमच्या बाळाला पोटदुखीमुळे किंवा अस्वस्थतेमुळे आणि खाज सुटण्यामुळे नीट झोप येत नसेल तर त्याच्या पोटात जंत असू शकतात.

त्वचेवर पुरळ -

सामान्यतः त्वचेवर पुरळ काही संसर्गामुळे किंवा धूळांमुळे उद्भवते.पण कधी कधी पोटात कृमी झाल्यामुळे हाताला किंवा पायावर लाल पुरळ उठतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT