How to Control Weight for Children
How to Control Weight for Children Saam Tv
लाईफस्टाईल

How to Control Weight for Children : कमी वयात मुलांचे वजन झपाट्याने वाढतेय ? वैतागले आहात ? 'या' 5 टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

How to Control Weight for Children : आजकालच्या बदलत्या आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे अनेक लहान मुलांचे खूप कमी वयात वजन वाढू लागले आहे. अशातच अनेक पालक आपल्या लहान मुलाच्या वाढत्या वजनामुळे चिंतीत आहेत.

त्याचबरोबर अनेक पालकांनी त्यांच्या मुलांचे वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांना यश आले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांचे वाढते वजन कमी करता येईल.

आजकाल प्रत्येक लहान मुलाचे वजन वाढत चालेले आहे. अशातच मुलांच्या वाढत्या वजनामागे अनेक कारणे असू शकतात. अशाने लहन मुले खूप कमी वयातच वाढत्या वजनामुळे अनेक गंभीर आजारांचे शिकार होतात. चला तर मग पाहुयात लहान मुलांचे (Child) वजन कशा पद्धतीने कमी करता येईल.

1. फिजीकल अॅक्टिविटी करून घ्या :

आजकालची सगळीच लहान मुले घरामध्ये बसून फोनवरती व्हिडिओ गेम्स खळतात. व्हिडीओ गेम्स खेळणारी सगळी लहान मुले मैदानी खेळ विसरत चालली आहेत. अशात पालकांनी त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे. त्याचबरोबर घरामध्ये डान्स (Dance) आणि व्यायाम करायला सांगावा. असं केल्याने तुमच्या मुलांचे वाढते वजन लवकरात लवकर कमी होईल.

2. जंक फूडपासून लांब रहा :

सगळीच लहान मुले घरातील हेल्दी जेवणापेक्षा बाहेरच्या तळलेल्या आणि भाजलेल्या पदार्थाचे सेवन करण्यास पसंती देतात. अशातच शुगरयुक्त पदार्थाचे सेवन करणे हे लहान मुलांच्या आरोग्यास (Health) हानिकारक ठरू शकते. साखरयुक्त पदर्थ खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू लागते. अशातच लहान मुलांना भूक लागल्यावर त्यांना तुम्ही घरीच बाहेरच्या जेवणासारखे चमचमीत पदार्थ बनवून द्या. घरामध्ये बनवलेली प्रतेक गोष्ट ही हेल्दी असल्यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर न्युट्रियेंट्स डाएट सर्व करा.

Child obesity

3. सकाळचा नाश्ता स्कीप करू नका :

सकाळी नाश्ता न केल्याने देखिल वजन वाढते. त्यामुळें लहान मुलांना नियमीतपणे दररोज सकाळी नाश्ता करायची सवय लावा. अशातच डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्यानुसार, लहान मुलांना नाष्ट्यामध्ये राजमा, ब्रोकोली, मटार, फूड ग्रेन, पास्ता आणि ऑमलेट यांसारख्या गोष्टी खाण्यासाठी द्या. त्याचबरोबर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही फ्रेश फ्रूट देखील लहान मुलांना देऊ शकता. यामुळे तुमची मुले काही दिवसांमध्येचं फिट आणि हेल्दी दिसून येतील.

4. लहान मुलांना टीव्ही पाहण्यापासून थांबवा :

काही मुले पूर्ण दिवसभर टीव्हीवर कार्टून किंवा आपला आवडता कार्यक्रम पाहतात. परंतू असं केल्याने मुलांची पूर्ण दिवसभर कोणतीच फीजिकल अॅक्टिवीटी होत नाही. याच कारणामुळे तुमच्या मुलांचे वजन झपाट्याने वाढत जाते. त्याचबरोबर लहान मुलांना जास्तीत जास्त शारिरक हालचाली करण्यास भाग पाडा. जेणेकरून तुमची मुले अॅक्टिव्ह राहतील आणि त्यांचे वजन कमी होण्यास मदत होईल.

5. वजन कमी करण्यासाठी भरपूर झोप घ्यावी :

लहान मुलांचे वजन कमी करण्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यांना रात्री 7 ते 8 तास झोपण्याची गरज असते. असं केल्याने तुमच्या मुलाचे वजन कमी होण्यास मदत होईल. त्याचरोबर चांगली झोप झाल्यामुळे तुमच्या मुलामध्ये फ्रेशनेस आणि अॅक्टिवपणा येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Shirur Crime: भावकीच्या वादातून दोन गटात तुफान राडा.. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; शिरुर तालुका हादरला

Supreme Court On Sandeshkhali Case : संदेशखाली प्रकरणी CBI चौकशी सुरूच राहणार; SC कडून बंगाल सरकारला झटका

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT