Turmeric in water inviting ghosts astrology saam tv
लाईफस्टाईल

Turmeric water inviting ghosts : पाण्यात हळद टाकण्याच्या ट्रेंडमुळे भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष्य तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Turmeric in water inviting ghosts astrology : आजकाल सोशल मीडियावर 'पाण्यात हळद टाकणे' हा ट्रेंड खूप व्हायरल होत आहे, जिथे लोक रात्रीच्या वेळी पाण्यात हळद मिसळून त्याचे व्हिडिओ आणि रील्स बनवत आहेत. या ट्रेंडमुळे अनेकांच्या मनात उत्सुकता आणि काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या इन्स्टाग्रामवर गेलं तर की एक व्हायरल झालेला ट्रेंड समोर येतो. यामध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये हळद टाकून त्या पाण्याचा रंग बदलला जातो. सध्या अनेकजण हा ट्रेंड फॉलो करतायत. सध्या सोशल मीडियावर एक विचित्र ट्रेंड जोरात व्हायरल झालाय. अनेक तरुण-तरुणी रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद मिसळून यावर रील्स तयार करतायत. मात्र हा ट्रेंड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी या ट्रेंडवर गंभीर इशारा दिला आहे. असं करण्यामागे तांत्रिक क्रिया असल्याचा दावा त्यांनी केलाय.

काय आहे हा ट्रेंड?

या ट्रेंडमध्ये रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद टाकण्याचे रील्स अनेकजण बनवतायत. अनेकांना यामागचा अर्थ माहित नसला तरी 'व्हायरल कंटेंट' म्हणून हे अनेक जण असं करतायत. पण ज्योतिषांच्या मते ही फक्त गंमत नाही, तर भविष्यातील संकटाना आपण निमंत्रण देतोय, असं म्हणणं आहे.

काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

अरुण व्यास यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की, "पाण्यात हळद मिसळणं हे काही साधं काम नाही. ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. इतकंच नाही तर ही क्रिया केली तर भूत-प्रेतांचं सावट घरावर येऊ शकतं."

या क्रियेचा कुंडलीवरही होतोय परिणाम

या विचित्र ट्रेंडचा ग्रहांवरही परिणाम होतो. व्यास यांच्या मते, या कृतीमुळे चंद्र आणि गुरु हे ग्रह दुर्बल होतात. यामुळे व्यक्तीच्या भाग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. त्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

ज्योतिष्य तज्ज्ञांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्स चिंतेत पडले आहेत. काहींनी कमेंटमध्ये विचारलं, "मी असा व्हिडिओ बनवला आहे, आता काय करावं?", तर काहींनी म्हटलं, "काही ज्योतिष तर पाण्यात हळद टाकून अंघोळ करण्याचा सल्ला देतात. मग ते बरोबर की चूक?" त्यामुळे या ट्रेंडवरून वाद निर्माण होत असल्याचं चित्र आहे.

या ट्रेंडवर आता वाद सुरू झाला आहे. दरम्यान अशा ट्रेंड्समध्ये सहभागी होण्याआधी योग्य माहिती घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT