Winter Hair Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Hair Care : हिवाळ्यात केस गळतीची समस्या अधिक होतेय ? अशी घ्या काळजी

थंडी असल्यामुळे गरम पाणी चा वापर केस धुण्यासाठी करतो त्यामुळे केसांमध्ये कमजोरी येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Hair Care : हिवाळ्यात चेहरा कोरडा पडतो तसेच केसांच्या समस्या पण येतात. केसात कोंडा होणे, खाज सुटणे अशा समस्या येतात. थंडी असल्यामुळे गरम पाणी चा वापर केस धुण्यासाठी करतो त्यामुळे केसांमध्ये कमजोरी येते. थंडी आल्यावर आपल्या अनेक या समस्याचा सामना करावा लागतो त्यामुळे थंडी (Cold) मध्ये केसांची (Hair) काळजी कशी घेयायची याबद्दल माहिती देणार आहोत.

गरम पाण्याने केस धुवू नका -

हिवाळ्यात गरम पाणी नक्कीच आराम देते, परंतु ते टाळूसाठी चांगले नाही. यामुळे कोंडा तर वाढतोच, पण केस गळणे आणि तुटणे देखील होते.

केमिकलयुक्त शैम्पू वापर करू नका -

केमिकलयुक्त शैम्पू आपल्या केसांना कमजोर करतात तसेच केस कोरडे होतात त्यामुळे natrual शैम्पूचा उपयोग केला पाहिजे त्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतील.

शक्यतो ड्रायरचा उपयोग करू नका -

ड्रायरचा वापर केल्यामुळे आपले केस लगेच सेट होतात पण त्यातून गरम गरम वाफ केसांना लागते त्या वाफेमुळे केस कमजोर होतात तसेच केस गळतात.त्यामुळे केस सेट करण्यासाठी ड्रायरचा उपयोग करू नये.

योग्य आहार घ्या -

आपला आहार नेहमी योग्य असावा त्यामुळे आपले आरोग्य चागले राहते.केस मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात फळे,भाज्यांचा समावेश करावा.सिझनल फ्रूट खाल्याने केसांवर चागला परिणाम होतो.

आठवड्यात एकदा हेअर मसाज नक्की करा -

आठवड्यात एकदा केसांना तेल लावून माध्यापसून मालिश केली पाहिजे त्यामुळे केसातील कोरडेपणा दूर होतो आणि तुमचे केस वाढण्यात सुद्धा मदत होते

केस हळूहळू विचरा -

केसाला जोरजोरात कंगवा लावून विचरू नये त्यामुळे केस तुटतात. टाळू वर खाज सुटते. तसेच केसाची ताणून वेणी घालू नका त्यामुळे केस ताणून तुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो केस जरा लुझ बांधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

Shepu Mungdaal Recipe : घराघरात बनणारी स्वादिष्ट शेपू मूगडाळीची भाजी, एकदा करुनच बघा

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT