Throat Cancer  Saam Tv
लाईफस्टाईल

Throat Cancer : सावधान! घोरण्याच्या सवयीमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Snoring Warning Sign Throat Cancer : घोरण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची कमतरता वाढून कर्करोग होण्याचा धोका असतो?

कोमल दामुद्रे

Snoring Problem :

अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते त्यामुळे कधीकधी कुटुंबाचा किंवा पार्टनरचा रोष सहन करावा लागतो. घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये लठ्ठपणा, मद्यपान, सर्दी, सायनसची समस्या, ऍलर्जी किंवा अतिरिक्त खाण्याचे प्रमाण असू शकते.

सतत घोरण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर परिणामही होऊ शकतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) हे देखील घोरण्याचे कारण असू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार 'ओएसए'ने त्रस्त असलेल्या लोकांना घशाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

तज्ज्ञांच्या मते, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा झोपेदरम्यान श्वास घेण्याशी संबंधित विकार आहे. यामुळे झोपल्यानंतर अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टमध्ये श्वसनक्रिया बंद पडते. यामुळे आपल्याला झोप तर लागते पण नाक बंद होऊन आपण घोरू लागतो. स्पेन स्पेनमधील बार्सिलोना येथील युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी (ERS) येथे सादर केलेल्या मोठ्या अभ्यासानुसार ज्यांचे वजन जास्त, मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि अतिरिक्त प्रमाणात धुम्रपान-मद्यपान करतात त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा सर्वाधिक धोका असतो. शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घेऊया

1. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

तज्ज्ञांच्या मते अभ्यासात असे दिसून आले की, स्लीप एपनिया हा आजार (Disease) वयोवृद्धांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यामध्ये 74 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून आली आहे. संशोधकांनी सांगितले की, तिसर्‍या अभ्यासात असे आढळून आले की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाने पीडित लोकांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. दीर्घकाळ श्वास रोखून ठेवल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार (Heart Attack) आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.

झी न्यूजच्या वृत्तानुसार संशोधक डॉ. अँड्रियास पाम म्हणाले की, ओएसएने ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्यातील कर्करोगाचे कारण देखील शोधले पाहिजे. कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे कॅन्सर (cancer) होऊ शकतो, याबाबत त्यांनी निष्कर्ष लावला आहे. ज्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला

2. कर्करोगाचे कारण

संशोधक डॉ. अँड्रियास पाम म्हणाले की, ओएसएने ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्यातील कर्करोगाचे कारण देखील शोधले पाहिजे. कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे कॅन्सर होऊ शकतो, याचे स्पष्ट पुरावे अभ्यासाच्या निष्कर्षात मिळाले आहेत. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना जीवही गमवावा लागतो.

ते म्हणतात की, स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांना कर्करोगाचा धोका असतो, असा अंदाज आधीच बांधला गेला आहे. स्लीप एपनिया हा आजार खराब जीवनशैलीमुळे होतो परंतु अद्यापह स्पष्ट झालेले नाही. परंतु, ओएसएमुळे रक्तातील ऑक्सिजनची कमतरता कर्करोगाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

Katrina Kaif : निखळ हास्य अन् चेहऱ्यावर ग्लो; आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी घेणार माघार

Veen Doghantali Hi Tutena : समरसोबतची मैत्री तुटली, आनंदचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वानंदी दोन जिवलग मित्रांना कसं जवळ आणणार? | VIDEO

Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT