Summer Skin Problems google
लाईफस्टाईल

Summer Skin Problems: उन्हाळ्यात अतिप्रमाणात ऊसाचा रस पिताय? मग थांबा! उद्भवतील त्वचेच्या 'या' समस्या

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळा आला की थंड पेय आपल्या रोजच्या सेवनात असतात. पण सगळ्यांच्या तब्बेतीसाठी ही थंड पेय योग्य नसतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

Saam Tv

उन्हाळा सुरू होताय आपण थंड पेयांकडे आकर्षित होत असतो. उन्हाळ्यात आपण घरी असू किंवा बाहेर थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा वारंवार होतच असते. उन्हाळ्यात पेयांमध्ये आपण ऊसाच्या रसाचे सेवन आपण जास्त प्रमाणात करतो. पण त्याने तुमच्या त्वचेला नुकसान होतं का? हा प्रश्न सुद्धा अनेकांच्या मनात येतो. आज आपण याच बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

ऊसाच्या रसाचे फायदे (Sugarcane Juice Benefits)

ऊसाच्या रसात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, पोटॅशिअम, मिनरल्सचे प्रमाण जास्त असते. हे सगळ शरीराला पोषक तत्व देतात. (Is Sugarcane Juice Good For Diabetes) म्हणून लहान, मोठे, रुग्ण, वृद्ध अशी सगळी मंडळी ऊसाचा रस उन्हाळ्यात पितात. पण तुम्हाला माहितीये का? ऊसाच्या एका ग्लासात २५० कॅलरीज आणि १०० ग्रॅम शुगर असते. त्यामुळे शक्यतो दिवसातून जास्तीत जास्त २ ग्लास ऊसाचा रस सेवन करावा. अन्यथा वजन वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागेल. तर ऊसामध्ये हीट जास्त प्रमाणात असल्याने आपल्याला आरोग्याच्या इतर समस्यांना देखील सामोरं जावं लागू शकतं.

ऊसाचा रस प्यायल्याने होणारे नुकसान (sugarcane juice side effects)

1 . मधुमेह (Diabetes)

ऊसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असतं. तर ऊसामध्ये ग्लायसेमिक लोडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांच्या रक्तातली साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. तसेच हदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांवर वाईट परिणाम होतो. म्हणून मधुमेहींनी शक्यतो ऊसाचे सेवन टाळवा. किमा अर्धा कपा पेक्षा अधिक सेवन करणे टाळावे.

2. दातांच्या समस्या ( Dental problems)

ज्या व्यक्तींच्या दाताच गॅप आहे किंवा दाढेचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी गोड पदार्थ किंवा पेय खाणं जमेल तितकं टाळलं पाहिजे. तसेच ऊसाच्या रसाचे सेवनही टाळलं पाहिजे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढतो. तर दातांमध्ये पोकळी निर्माण होते. त्यामुळे दात किडतात, दुखतात. तर या समस्या शक्यतो लवकर बऱ्या होत नाहीत.

3. त्वचेच्या समस्या ( Skin problems)

ऊसाच्य रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या त्वचेवरही होत असतो. तुमचा चेहरा वृद्धांसारखा ताणलेला आणि सुकलेला दिसतो. शरीरात जेव्हा साखरेचे प्रमाण अधिक वाढते. तेव्हा रक्तप्रवाहातील संयुगे वाढून त्वचेतील लवचिकपणा कमी होऊन कोलेजनला नुकसान होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT