Health News Saam Tv
लाईफस्टाईल

Health News : आरोग्यासाठी रात्री पाणी पिणे फायदेशीर आहे की, धोकादायक ? जाणून घ्या

आपल्याला शरीरातील बहुतेक भाग हा पाण्याने भरलेला आहे.

कोमल दामुद्रे

Health News : पाणी हे आपल्याला जीवनातील आवश्यक भाग आहे. आपल्याला शरीरातील बहुतेक भाग हा पाण्याने भरलेला आहे. पाण्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. म्हणूनच आपल्याला सतत पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

नियमित पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. जर तुम्ही प्रतिदिन ८ ते १० ग्लास पाणी (Water) पित असाल तर तुम्हाला आपले पोट भरलेले वाटेल. त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. तुम्हालाही वजन कमी करायचे असल्यास जेवणाच्या आधी पाणी पिणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.

आपले शरीर निरोगी आणि समाधानी ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी न प्यायल्याने विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. पाण्याच्या अभावामुळे मायग्रेन, अपचन, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, साइनसायटिस, फुफ्फुसातील क्षयरोग आणि लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र, प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो रात्री पाणी पिणे फायदेशीर आहे का ?

तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक आहे, ज्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते. तसेच जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे देखील पाण्यामुळे शरीरात शोषली जातात. पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया निरोगी राहते. पाण्याचे पुरेसे प्रमाणात सेवन केल्यास शरीर हायड्रेटेड होण्यास मदत होते.

जेवणाच्या एक तासाआधी किंवा जेवणाच्या एक तासानंतर पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो. तसेच अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या कमी होते. तसेच रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर लिंबूपाणी, ग्रीन टी, हर्बल टी व इतर आरोग्यदायी पेयांचे सेवन आपण करु शकतो.

बरेच जणांना रात्री झोपेत तहान लागते त्यामुळे झोप देखील मोड होते. अशावेळी रात्री पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने पुन्हा तहान लागत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post C-section bloating: प्रसूतीनंतर पोट फुगण्याची तक्रार का वाढते? डॉक्टरांनी सांगितले समस्येचे सोपे उपाय

Maharashtra News Live Update: उद्या जेजुरी गडावर होणार सोमवती अमावस्या साजरी

Mouni Roy: दिशा पटानी अन् मौनी रॉय रिलेशनशिपमध्ये होते? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बीड पुन्हा हादरलं; कंत्राटदार तुकाराम मुंडेंचे परळीतून अपहरण, मुख्य सूत्रधार कोण?

Shocking : महाराष्ट्रातील इंजिनीयरची लंडनमध्ये आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT