High Cholesterol SAAM TV
लाईफस्टाईल

High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या 4 भाज्या नक्की खा!

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ब्रोकली, फ्लॉवर, गाजर आणि केल यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश कसा फायदेशीर ठरू शकतो, जाणून घ्या. या भाज्यांमधील पोषक घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल तेलकट पदार्थांचे जास्त सेवन, बरेच तास एका जागी बसून काम करण्याची सवय आणि व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयातच अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होत आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर आहारात बदल करणं खूप गरजेचं आहे.

मॅक्स हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांच्या मते, काही भाज्या नियमित आहारात घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यामुळे हृदयाचं आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळते.

ब्रोकली

ब्रोकली ही अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, त्यांनी शक्य असल्यास ही भाजी आहारात समाविष्ट करावी. ब्रोकलीचे नियमित सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. तसंच हृदय मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठीही ती फायदेशीर मानली जाते.

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये सल्फोराफेन नावाचा घटक असतो. हे हृदयाभोवती अतिरिक्त चरबी साचू न देण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगले राहतं. हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनीही फुलकोबीचा आहारात समावेश करावा.

गाजर

गाजरामध्ये व्हिटॅमिन एसह अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. गाजर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते. निरोगी हृदयासाठी गाजर नियमित खाणे फायदेशीर ठरू शकते. गाजर भाजीसोबत किंवा सॅलडच्या स्वरूपातही खाता येते.

केल

केल या पालेभाजीत पोटॅशियम, फायबर, फोलेट आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हे सर्व घटक शरीरासाठी उपयुक्त आहेत. केलचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने ही भाजी आहारात समाविष्ट करण्याचा विचार करू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात प्या आलं, लसूण आणि कोथिंबीर सूप; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

Dipika Kakar Video : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलमध्ये; पती शोएबने सांगितले नेमकं काय झाले?

8th Pay Commission: पेंशनर्ससाठी खुशखबर! किमान पेन्शनमध्ये ६७% वाढ आणि वयानुसार १००% वाढीचाही प्रस्ताव

Political News : भाजपा महिला आमदार वादाच्या भोवऱ्यात, तरुणाला अपमानास्पद शब्दांत झापलं, ऑडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT