Late night dinner SAAM TV
लाईफस्टाईल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

Eating dinner late: रात्री उशिरा आणि जड जेवण करण्याची सवय झोप, पचन आणि वजनावर परिणाम करू शकते. झोपण्याच्या काही तास आधी हलकं जेवण केल्यास शरीराला पचनासाठी वेळ मिळतो. रात्रीच्या आहारात कॅलरीचे प्रमाण आणि जेवणाची वेळ याकडेही लक्ष द्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रात्री उशिरा जेवणं अनेकांच्या रोजच्या सवयीचा भाग आहे. शहरांमध्ये कामामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेक जण रात्री १० ते ११ वाजेपर्यंत जेवतात. मात्र, रोज उशिरा आणि जास्त जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

डायबिटीज, वजन वाढणं, रक्तदाब आणि रक्तातील साखरेशी संबंधित समस्या यांचा धोका वाढण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, रात्री शक्यतो हलकं जेवण करणं आणि झोपण्याच्या काही तास आधी जेवण आटोपणं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.

रात्री हलकं जेवण का करावं?

रात्रीच्या वेळी शरीर हळूहळू विश्रांतीच्या अवस्थेत जातं आणि पचनक्रियाही दिवसभराच्या तुलनेत मंदावते. त्यामुळे रात्री उशिरा भरपूर किंवा जड जेवण केल्यास ते पचायला त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, पोटदुखी आणि अॅसिडिटीसारख्या समस्या जाणवू शकतात.

लवकर जेवल्यास झोप चांगली लागते

झोपण्याच्या साधारण २ ते ३ तास आधी जेवण केल्यास अन्न पचण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे झोपताना पोटावर अतिरिक्त ताण राहत नाही आणि शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते. याउलट रात्री उशिरा जेवून लगेच झोपल्यास झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो.

रात्रीचं जेवण शक्यतो हलकं आणि कमी कॅलरीचं असावं. यासाठी भाजी, सलाड, खिचडी किंवा डाळ यांसारखे पदार्थ आहारात घेता येऊ शकतात. रात्री गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेत राहिल्यास वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.

रात्री ७ वाजण्याच्या सुमारास जेवण केल्यास अन्न पचवण्यासाठी शरीराला बराच वेळ मिळतो. झोपण्यापूर्वी जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहिल्यामुळे पचनक्रियेला आपलं काम पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर आटोपण्याची सवय पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते.

रात्री उशिरा जेवल्याने काय नुकसान होऊ शकतं?

रात्री १० ते ११ वाजता जेवून लगेच झोपण्याची सवय असेल तर शरीराला विश्रांती घेण्याऐवजी अन्न पचवण्याचं काम सुरू ठेवावं लागतं. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि गॅस, अॅसिडिटी तसेच अपचनाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवणं आणि त्यानंतर लगेच झोपणं टाळणं योग्य ठरू शकतं.

रात्री उशिरा जेवल्याने वजनावर परिणाम होऊ शकतो

दिवस जसा जसा पुढे जातो तसं शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया आणि मेटाबॉलिझम तुलनेने मंदावतं. अशा वेळी गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतल्यास त्या शरीरात साठण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे रात्री उशिरा आणि जड जेवण करण्याची सवय वजन वाढवू शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

H1N1 eye symptoms: तुम्हालाही फ्लूनंतर डोळ्यांत जळजळ होतेय? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतो मोठा धोका

SCROLL FOR NEXT