सावधान! अचानक अंग थंड पडतंय अन् घाम येतोय? 'हार्ट अटॅक' येण्याआधी शरीर देतं हे ७ संकेत; वेळीच व्हा सावध

Sakshi Sunil Jadhav

बदलती लाइफस्टाइल

बदलत्या लाइफस्टाइलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे कोणीही किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतो.

silent heart attack symptoms

सायलेंट हार्ट अटॅक

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे नेहमीसारखी तीव्र छातीत वेदना न होता हार्टला रक्तपुरवठा कमी होऊन स्नायूंना इजा होणं. त्यामुळे तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे.

silent heart attack symptoms

जबडा दुखणे

अचानक जबड्यात किंवा चेहऱ्याच्या भागात वेदना होणे हे हॉर्ट अटॅकचं सर्वात सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

silent heart attack symptoms

प्रचंड थकवा

नेहमीपेक्षा अचानक जास्त थकवा जाणवत असेल तर त्याकडे फक्त कामाचा ताण म्हणून पाहू नका. हा हार्ट अटॅकचा धोका असू शकतो.

Extreme Fatigue

श्वास घेताना त्रास होणे

विश्रांतीच्या वेळीही धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे किंवा श्वासोच्छवासाच्या पद्धतीत अचानक बदल होणे धोक्याचे ठरू शकते.

Difficulty Breathing

थंड घाम

अचानक शरीर थंड पडतं आणि थंड घाम फुटतो, सोबत मळमळ किंवा चक्कर यांसोबत असेल तर ते गंभीर हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

Difficulty Breathing

चक्कर येणे

सतत चक्कर येणे किंवा डोकं हलकं वाटणे यामागे शरीरातल्या रक्तपुरवठ्यातला अडथळा कारणीभूत असू शकतो.

silent heart attack signs

मळमळ जाणवणे

मळमळ, उलटीसारखे वाटणे किंवा पोटात अस्वस्थता ही लक्षणे काही वेळा हृदयविकाराच्या झटक्यासोबत दिसू शकतात.

Dizziness

छाती अस्वस्थता

जास्त तीव्र वेदना नसल्या तरी छातीत दडपण, जडपणा, कळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर दुर्लक्षित करू नका.

heart attack symptoms

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HEART ATTACK SYMPTOM | PINTREST

NEXT: खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

Sitting Too Long | meta ai
येथे क्लिक करा