Eye care tips saam tv
लाईफस्टाईल

Eye care tips: मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? दुर्लक्ष केल्यास दृष्टीला बसू शकतो मोठा फटका!

Regular eye checkup: मोबाईलचा वापर, उन्हातील अतिनील किरणे आणि प्रदूषणामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. नियमित डोळ्यांची तपासणी, २०-२०-२० नियम, सनग्लासेस आणि योग्य सवयींमुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या काळात मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यातच बाहेर खेळण्यासाठी कमी मिळणारा वेळ, रात्री उशिरापर्यंत जागणं, उन्हाचा आणि प्रदूषणाचा डोळ्यांवर होणारा परिणाम यामुळे अनेकांना डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवू लागले आहेत. डोळे थकणं, अंधुक दिसणं आणि डोळ्यांवर ताण येणं अशा समस्या वाढताना दिसत आहेत.

डोळ्यांची नियमित तपासणी का गरजेची?

डोळ्यांचे काही आजार सुरुवातीला कोणताही त्रास न देता वाढू शकतात. काचबिंदू (ग्लॉकोमा) आणि मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम यामुळे हळूहळू दृष्टी कमी होऊ शकते. सुरुवातीला वेदना होत नसल्याने अनेकांना या आजारांची जाणीव होत नाही. ज्यावेळी दृष्टी कमी झाल्याचं लक्षात येतं, तेव्हा काही प्रमाणात नुकसान झालेलं असू शकतं. त्यामुळे नियमित तपासणी केल्यास डोळ्यांमधील बदल वेळेत समजू शकतात आणि योग्य उपचार करणं सोपं होतं.

सीओओ (COO), बिहार विभाग, एएसजी हॉस्पिटल लिमिटेडच्या बिहार विभागाचे सीओओ डॉ. संजय सिन्हा यांनी सांगितलं की, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी, कुटुंबात डोळ्यांचे आजार असलेल्या व्यक्तींनी आणि वयाची ४० वर्षे पूर्ण झालेल्यांनी अधिक काळजी घ्यावी. लहान मुलांचीही डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. कारण मुलांना स्पष्ट दिसत नसल्यास त्याचा परिणाम अभ्यासावर आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो. मात्र, मुलांना नेमका काय त्रास होतोय, हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही.

उन्हामुळेही डोळ्यांना होऊ शकते इजा

उन्हात बाहेर पडताना अनेकजण त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावतात. मात्र डोळ्यांचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सूर्याच्या अतिनील किरणांचा (यूव्ही किरणांचा) डोळ्यांवर दीर्घकाळ परिणाम झाल्यास मोतीबिंदू होण्याचा धोका वाढू शकतो. मोतीबिंदूमुळे डोळ्यांसमोर धूसर दिसू लागते. तसंच या किरणांमुळे डोळ्यांच्या वरच्या भागाला उन्हामुळे भाजल्यासारखी वेदनादायक इजाही होऊ शकते.

आकाशात ढग असले तरी सूर्याची अतिनील किरणं असू शकतात. पाणी, काच आणि रस्त्यांवरूनही ही किरणं परावर्तित होतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि त्यांना इजा होण्याचा धोका असतो. म्हणून उन्हात बाहेर पडताना डोळ्यांचे संरक्षण करणं आवश्यक आहे.

प्रदूषणामुळे डोळे लाल होणं, खाज सुटणं शक्य

आपले डोळे सतत आजूबाजूच्या हवेच्या संपर्कात असतात. त्यामुळे धूळ, धूर आणि प्रदूषित हवेचा परिणाम डोळ्यांवर लगेच होऊ शकतो. यामुळे डोळे लाल होणं, खाज सुटणं, डोळ्यांतून पाणी येणं किंवा डोळे कोरडे पडणं अशा समस्या जाणवू शकतात. यामुळे डोळ्यांना अस्वस्थ वाटतं. दीर्घकाळ प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने दृष्टीवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचाही धोका वाढू शकतो.

प्रदूषित हवा पूर्णपणे टाळणं शक्य नसलं तरी काही साध्या सवयींमुळे डोळ्यांचं संरक्षण करता येतं. धूळ किंवा धूर असलेल्या रस्त्यांवरून जाताना डोळे व्यवस्थित झाकले जातील असा चष्मा वापरणं आणि घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने डोळे धुणे यांसारख्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या सवयी ठेवा

  • डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात काही सोप्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • उन्हात बाहेर जाताना अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे सनग्लासेस आणि टोपी वापरा.

  • धूळ किंवा धूर असलेल्या रस्त्यांवरून जाताना डोळे व्यवस्थित झाकले जातील असा चष्मा घाला. घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.

  • डोळ्यांना खाज येत असली तरी ते चोळू नका.

  • मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वापरताना २०-२०-२० हा नियम पाळा. दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील एखाद्या वस्तूकडे २० सेकंद पाहा. तसंच डोळ्यांची उघडझाप नियमित करा.

  • स्क्रीन डोळ्यांपासून योग्य आणि आरामदायी अंतरावर ठेवा.

  • मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. बाहेर खेळताना त्यांच्या डोळ्यांचं संरक्षण होईल याचीही काळजी घ्या.

  • संतुलित आहार घ्या आणि पुरेसं पाणी प्या.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत आय ड्रॉप्स टाकू नका. डोळे लाल झाले, दुखू लागले किंवा दृष्टीमध्ये बदल जाणवला, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest : मेट्रो आणि ट्रेन लगेच सुरू करा!; सुप्रीम कोर्टाचा संताप, सरकारला दिलं महत्त्वाचे आदेश

Maharashtra News Live Update: आशुतोष रांका आणि सौरव दास यांची पत्रकार परिषद सुरू

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

SCROLL FOR NEXT