Blood sugar levels: फास्टिंग ब्लड शुगर आणि जेवणानंतरच्या ग्लुकोजमध्ये नेमका काय फरक?

Surabhi Jayashree Jagdish

फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे काय?

फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे रात्रभर उपाशी राहिल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासणं होय. यासाठी साधारणपणे किमान ८ तास काहीही न खाता उपवास केलेला असतो आणि ही तपासणी सकाळी खाण्या-पिण्यापूर्वी केली जाते.

Post meal blood sugar | saam tv

फास्टिंग ब्लड शुगर किती असावी?

फास्टिंग ब्लड शुगर ही रक्तातील साखरेच्या नियंत्रणाची महत्त्वाची माहिती देते. साधारणपणे ७० ते १०० मिलीग्रॅम प्रति डेसीलिटर (mg/dL) ही उपाशीपोटी रक्तातील साखरेची सामान्य श्रेणी मानली जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, वय आणि इतर परिस्थितीनुसार डॉक्टरांनी ठरवलेले लक्ष्य वेगळे असू शकते.

Normal blood sugar range | saam tv

फास्टिंग शुगर जास्त असेल तर?

फास्टिंग ब्लू शुगर सतत जास्त येत असेल तर ते प्री-डायबेटीज किंवा डायबेटीजचे संकेत असू शकतात. रक्तातील साखर दीर्घकाळ जास्त राहिल्यास हार्ट अटॅक, किडनीच्या समस्या आणि नसांना होणारं नुकसान यांसारख्या गुंतागुंतींचा धोका वाढू शकतो.

Diabetes glucose levels | saam tv

जेवणानंतरची ग्लुकोज पातळी

जेवणानंतरची ग्लुकोज पातळी म्हणजे जेवण केल्यानंतर रक्तातील साखर किती वाढते, हे तपासणं. साधारणपणे जेवण झाल्यानंतर दोन तासांनी ही तपासणी केली जाते. यामुळे जेवणातील कर्बोदकांचे सेवन झाल्यानंतर शरीर रक्तातील साखरेचे नियंत्रण कसं करतं याची माहिती मिळते.

Normal post meal glucose | saam tv

जेवणानंतरची ग्लुकोज पातळी किती असावी?

जेवणानंतर रक्तातील साखर खूप वाढून पुन्हा झपाट्याने खाली येऊ नये यासाठी ती योग्य मर्यादेत ठेवणं महत्त्वाचे आहे. साधारणपणे जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील ग्लुकोज १४० mg/dL पेक्षा कमी असणं सामान्य मानलं जातं.

Blood sugar control | saam tv

जेवणानंतरची साखर वाढली तर?

जेवणानंतरची ग्लुकोज पातळी तपासल्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचा शरीरातील रक्तातील साखरेवर किती परिणाम होतो हे समजण्यास मदत होते. ही पातळी वारंवार जास्त येत असेल तर ग्लुकोज सहन करण्याची शरीराची क्षमता कमी होणं, इन्सुलिनचा योग्य वापर न होणं किंवा डायबेटीजची शक्यता दिसू शकते.

High post meal blood sugar | saam tv

या दोन्ही तपासण्यांमधून काय समजतं?

फास्टिंग ब्लड शुगर आणि जेवणानंतरची ग्लुकोज पातळी दोन्ही रक्तातील साखरेबाबत माहिती देतात, पण त्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात. फास्टिंग शुगरमधून उपाशीपोटी शरीर रक्तातील साखरेचं नियंत्रण कसं करतं, हे समजतं. तर जेवणानंतरच्या तपासणीतून अन्न खाल्ल्यानंतर शरीरात साखरेचं नियंत्रण कसं होतंय याची माहिती मिळते.

Diabetes symptoms | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Insulin resistance | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा