Bank Job Saam tv
लाईफस्टाईल

Bank Job : तरुणांनो, CIBIL Score चांगला ठेवा! मिळेल बँकेत नोकरीची संधी

Does your CIBIL Score affect your employment : चांगल्या CIBIL Score शिवाय तुम्हाला बँकेत नोकरी मिळणार नाही. बँकिंग क्षेत्रातील भर्ती एजन्सी IBPS ने RRB, IBPS लिपिक आणि PO भर्ती सूचनांमध्ये नवीन निकष सादर केला आहे.

कोमल दामुद्रे

CIBIL Score Important For Bank Job :

तरुणांनो, बँकेत काम करण्याच्या इच्छा असेल तर तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेत जर तुम्हाला काम करायचे असेल तर तुमचा CIBIL Score चांगला असणे आवश्यक आहे.

चांगल्या CIBIL Score शिवाय तुम्हाला बँकेत नोकरी (Job) मिळणार नाही. बँकिंग क्षेत्रातील भर्ती एजन्सी IBPS ने RRB, IBPS लिपिक आणि PO भर्ती सूचनांमध्ये नवीन निकष सादर केला आहे. ज्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, यामध्ये अर्जदारांचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे अधिक आवश्यक आहे.

1. क्रेडिट स्कोअर 650 च्या वर असावा

उमेदवार बँकेच्या परीक्षेसाठी बसताना त्याचा क्रेडिट स्कोअर 650 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी IBPS आणि बँक (Bank) पदासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्याच्या CIBIL स्कोअरची माहिती असली पाहिजे. याबाबत IBPS चे अध्यक्ष एमव्ही राव यांनी म्हटले की, कमी क्रेडिट स्कोअर असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळणार नाही.

2. CIBIL स्कोअर काय आहे?

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया)लिमिटेड देशातील CIBIL क्रेडिट स्कोअर जारी करते ज्यामध्ये ३०० ते ९०० पर्यंत असते. हा तीन अंकी स्कोअर आहे जो एखाद्या व्यक्तीची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता दर्शवतो. तसेच तुमच्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला किती कर्ज (Loan) मिळू शकते हे समजेल.

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला सिबिल स्कोअरचे पत्र द्यावे लागेल. हे तुम्हाला नोकरीवर रुजू होण्यापूर्वी द्यावे लागेल. हे सबमिट केले नाही तर तुम्हाला ऑफर लेटर मिळणार नाही.

3. नव्या नियमांमुळे उमेदवार त्रस्त

बँकेत नोकरी करु पाहाणाऱ्या उमेदवार बँकेच्या नव्या नियमांमुळे हैराण आहेत. जे लोक २० ते २८ वयोगटात आहेत, नोकरीच्या अनुभवाशिवाय नवीन पदवीधरांसाठी क्रेडिट स्कोअरच्या मागणीवरील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच कोचिंक सेंटरच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार बँक खाती नसलेल्या लोकांना त्यांचे CIBIL Score तपासण्यात सूट देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT