buttermilk benefits in Marathi, health care tips in marathi, Digestion diet tips, buttermilk benefits for acidity, buttermilk benefits and side effects ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Butter milk tips : ताक खरंच शरीरासाठी 'चांगलं' आहे का?

ताकाचे सेवन करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उकाडा वाढत चालला असून तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात आपल्याला सतत थंड पाणी (water) पिण्याची सवय लागते अशा हवामानात फळांचे रस, लस्सी, सोडा आणि गॅसने भरलेल्या पेयांचे सेवनही वाढते. अगदी लहांनापासून- मोठ्यापर्यंत सर्वांचे आवडते पेय म्हणजे अर्थात ताक. ताक हा दुधापासून बनवला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे, जो दूधाला घुसळवून त्याचे लोणी आपण बनवतो. हे घुसळन केलेले दूध (Milk) फॅटमुक्त असल्यामुळे त्यातून लोणी वेगळे होते आणि आपल्या शरीराला अनुकूल आरोग्यास बॅक्टेरिया मिळतात. (Buttermilk benefits and side effects in Marathi)

ताकात प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे अ आणि ड चे अद्भुत स्रोत आहे. ताकाचे प्रोबायोटिक स्वरूप योग्य पचन आणि पोट स्वच्छ ठेवण्यास खूप मदत करते.

हे देखील पहा-

ताक पिण्याचे आरोग्य फायदे

- ताकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन (Vitamins) अ आपली दृष्टी मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवून हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंड यांसारखे अंतर्गत अवयव निरोगी ठेवते.

- ताक घुसळल्याच्या प्रक्रियेनंतर ताकामध्ये उरलेले बॅक्टेरिया लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात, ज्यामुळे लैक्टोज आपल्याला पचण्यास सोपे होते.

- तसेच ताकतील गुणधर्मामुळे एमिनो अँसिडचे पचन होण्यास मदत करते. शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करण्यासाठी अमिनो अँसिड महत्त्वाची असतात.

ताकाचे जसे फायदे आहेत तसेच त्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो.

ताकाचे दुष्परिणाम

- ताकात सोडियमचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांनी ताक पिणे टाळा.

- ताप, सर्दी आणि परागकणाची समस्या असलेल्यानी रात्रीचे ताक पिणे योग्य नाही.

- लोणी तयार होण्यासाठी काही दिवस लागतात. यामुळे बॅक्टेरियाचा विकास होतो ज्यामुळे ते मुलांसाठी हानिकारक असू शकते. यामुळे मुलांना सर्दी आणि घशाचा संसर्ग होऊ शकतो.

डिस्क्लेमर: आहारात ताकाचा समावेश करताना कृपया आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT