Chutney For Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Garlic and cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतं. लसणातील अॅलिसिनसह काही घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जाणून घ्या लसणाचे संभाव्य फायदे आणि घरच्या घरी तयार करता येणारी सोपी चटणी रेसिपी.

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल म्हटलं की, अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी पूर्णपणे वाईट नसतं. शरीराच्या योग्य कार्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं. वाढलेलं कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब यांसह अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतं.

आजच्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव, चुकीच्या वेळेचं खाणं आणि तेलकट-प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येते. अशावेळी आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यापैकी एक म्हणजे लसूण.

लसूण हा स्वयंपाकघरातील नेहमी वापरला जाणारा पदार्थ आहे. पदार्थांची चव वाढवण्यासोबतच लसणामध्ये काही आरोग्यदायी गुणधर्मही आढळतात. त्यामुळे लसणाचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करता येतो. लसणाची चटणी हा त्यासाठी एक सोपा पर्याय आहे. लसूण कोलेस्ट्रॉलसाठी नेमकी कशी उपयोगी ठरते ते जाणून घेऊया.

लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कसा मदत करू शकतो?

अँटीऑक्सिडंट गुणधर्म

लसणामध्ये 'अॅलिसिन' नावाचा एक घटक आढळतं. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याचं मानलं जातं. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतं. लसणाच्या सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL च्या पातळीला मदत होऊ शकते.

रक्ताभिसरण सुधारण्यास मदत

लसणामुळे रक्तवाहिन्यांवरही चांगला परिणाम होऊ शकतो. लसूण खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण निघून जाते आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही लसूण आहाराचा एक भाग बनवता येतो.

शरीरातील सूज कमी करण्यास मदत

लसणामध्ये सूज कमी करणारे म्हणजेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. रक्तवाहिन्यांमध्ये होणारी सूज कमी राहिल्यास कोलेस्ट्रॉल साचण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

लिव्हरच्या कार्यासाठी फायदेशीर

कोलेस्ट्रॉलचं नियंत्रणात ठेवण्यासाठी लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते. लसणाचं सेवन लिव्हरच्या कार्याला मदत करू शकतं, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत करतात.

कशी बनवाल लसणाची चटणी?

लसणाची चटणी बनवणं अगदी सोपं आहे. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून ही चटणी तयार करता येते. चविष्ट असल्यामुळे ती रोजच्या आहारातही सहज समाविष्ट करता येऊ शकते.

चटणीसाठी लागणारे साहित्य

  • लसूण- १० ते १२ पाकळ्या

  • कोथिंबीर- अर्धा कप, चिरलेली

  • हिरवी मिरची- २ ते ३, आवडीनुसार

  • लिंबाचा रस- १ मोठा चमचा

  • मीठ- चवीनुसार

  • जिरेपूड- अर्धा छोटा चमचा

  • ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेल- १ मोठा चमचा

चटणी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून त्या स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घाला. हे सर्व साहित्य बारीक वाटून घ्या. चटणी जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घालून पुन्हा वाटू शकता. चटणी बारीक झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस, जिरेपूड आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेल घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.

तयार झालेली चटणी एका वाटीत काढा. ही चटणी तुम्ही पोळी, पराठा किंवा डाळ-भातासोबत खाऊ शकता.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT