Shimla, Kullu And Manali IRCTC Tour Full Package, Booking Process Saam Tv
लाईफस्टाईल

IRCTC चा भन्नाट टूर पॅकेज! गुलाबी थंडीत शिमला, कुल्लू- मनाली फिरण्याची संधी, पॅकेजचा खर्च किती? पाहा सविस्तर

Shimla, Kullu And Manali IRCTC Tour Full Package, Booking Process : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीचं आपल्यापैकी अनेकांना सुट्टीचे वेध लागतात. जर यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी भन्नाट टूर पॅकेज आणले आहे.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package For Shimla, Kullu And Manali :

उन्हाळा सुरु होण्यापूर्वीचं आपल्यापैकी अनेकांना सुट्टीचे वेध लागतात. जर यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी भन्नाट टूर पॅकेज आणले आहे.

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला बजेटमध्ये शिमला (Shimla), मनाली आणि कुल्लूला फिरता येईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरण्याचा प्लान करु शकता. जाणून घेऊया बुकिंग खर्च (Price) किती?

पॅकेजचे नाव - IRCTC (SEA23)

पॅकेज कालावधी - ७ रात्री आणि ८ दिवस

प्रवास - फ्लाइट मोड

कुठे फिरता येईल?

शिमला, कुल्लू आणि मनाली

प्रवासाची तारीख

२७ मार्च

1. कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर पॅकेजमध्ये राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.

  • हॉटेलच्या सुविधामध्ये तुम्हाला राहण्यापासून ते खाण्यापर्यंत अनेक सुविधा मिळतील. यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.

  • तसेच यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळत आहे.

2. बुकिंग खर्च किती?

  • जर तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती ६७,५०० रुपये मोजावे लागतील.

  • कपल्स जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी ५३,४७० रुपये भरावे लागणार आहे.

  • फॅमिलीसोबत जाणार असाल तर एका व्यक्तीला ५१,१२० रुपये भरावे लागणार आहे. जर तुमच्या सोबत मुले असतील तर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह ४६,४२० रुपये तर बेडशिवाय ४३,८०० रुपये शुल्क भरावे लागतील. २ ते ४ वर्षाच्या वयोगटातील मुलांना ३३,८२० रुपये भरावे लागतील.

3. कसे कराल बुक?

पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT