New Year IRCTC Plan 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

New Year IRCTC Plan 2024 : नवीन वर्षात २५ हजारांत फिरा अंदमान-निकोबार, कसे कराल बुकिंग? किती दिवसांचे पॅकेज? वाचा सविस्तर

New Year Tour Under 25k : नवीन वर्षात फिरण्याचा प्लान करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला स्वस्तात मस्त ट्रिप करायची असेल तर हा IRCTC चा हा प्लान पाहू शकता. तुम्हाला परदेशात फिरायचे असेल तर अवघ्या २५ हजारात तुम्ही अंदमान निकोबारला फिरू शकता.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package :

हिवाळा सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते फिरण्याचे. डिसेंबर महिन्यात अनेक सुट्ट्या असल्यामुळे गुलाबी थंडीमध्ये फिरण्याची हौस असते. नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी अनेक जण फिरण्याचा प्लान करतात.

नवीन वर्षात (New Year) फिरण्याचा प्लान करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला स्वस्तात मस्त ट्रिप (Trip) करायची असेल तर हा IRCTC चा हा प्लान पाहू शकता. तुम्हाला परदेशात फिरायचे असेल तर अवघ्या २५ हजारात तुम्ही अंदमान निकोबार फिरू शकता.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), भारतीय रेल्वेची उपकंपनी, अंदमान आणि निकोबारला टूर पॅकेजस ऑफर करत आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गसौंदर्यासोबतच समुद्र ठिकाणी देखील फिरता येणार आहे.

1. IRCTC अंदमान टूर पॅकेज

IRCTC तुम्हाला ५ रात्री ६ दिवसांचे टूर पॅकेज देत आहे. IRCTC च्या अधिकृत वेबसाइटनुसार अंदमान-निकोबार हे टूर पॅकेज २३,९०० रुपयांपासून सुरु होत आहे. या टूर पॅकेजमध्ये हॉटेल, वाहतूक आणि खाण्यापिण्याचा खर्चाचा समावेश असणार आहे. यामध्ये विमानाचा खर्च केला जाणार नाही. फ्लाइटची सोय तुम्हाला स्वत: करावी लागेल. हे टूर पॅकेज तुम्हाला कधीही घेता येईल.

2. IRCTC टूर पॅकेज २३,९०० रुपयांपासून सुरु

IRCTC च्या टूर पॅकेजमध्ये हॉटेलसोबत ५ दिवस राहाण्याचा खाण्याचा समावेश असेल. हे टूर पॅकेज २३,९०० रुपयांपासून सुरु होते. तुम्ही एका व्यक्तीसाठी टूर पॅकेज घेतल्यास तुम्हाला ५२,७४० रुपये मोजावे लागतील. जर दोन व्यक्ती प्रवास करत असतील तर ३०,७७५ रुपये मोजावे लागतील. जर तीन व्यक्तींनी टूर पॅकेज घेतले तर त्यांना २७,४५० रुपये द्यावे लागतील. यावर सरकारी कर्मचारी एलटीसीचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. तुम्ही हे टूर पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वर बुक करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT