Tirupati Balaji Tour Package
Tirupati Balaji Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

New Year 2024: नवीन वर्षात IRCTC घेऊन येत आहे जबरदस्त टूर पॅकेज, फक्त 1930 रुपयांमध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन

Satish Kengar

New Year 2024 IRCTC Tirupati Balaji Tour Package: 

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने तुम्हीही कुठेतरी फिरण्याचा बेत आखायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला तिरुपती बालाजीला घेऊन जाण्यासाठी IRCTC ने एक अतिशय जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे.

तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. येथे असलेले व्यंकटेश्वर मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. हे मंदिर तिरुमला पर्वतावर बांधले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील लोक येथे दर्शनासाठी येतात. अशातच नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही IRCTC चे हे टूर पॅकेज घेऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधाही मिळणार आहेत. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे नाव आहे बेंगळुरू तिरुपती बालाजी दर्शन (BENGALURU TIRUPATI BALAJI DARSHAN). या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला एकूण 1 रात्र आणि 2 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. (Latest Marathi News)

हे टूर पॅकेज 2 जानेवारी 2024 पासून बेंगळुरू येथून सुरू होत आहे. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेज अंतर्गत तुमचा प्रवास बसने केला जाईल. यामध्ये तुम्हाला मल्टी एक्सल एसी बसने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला गाईडची सुविधाही मिळत आहे. याशिवाय तुम्हाला दर्शनाची तिकिटेही दिली जातील. यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करण्याची गरज नाही.

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला तिरुमला आणि तिरुपती येथे नेले जाईल. पॅकेजचा एक भाग म्हणून तुमच्या निवासासाठी हॉटेलची व्यवस्था देखील केली जाईल. जर आपण याच्या किंमतीबद्दल बोललो तर आयआरसीटीसीच्या तिरुपती बालाजी टूर पॅकेजची किंमत 1930 रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT