लाईफस्टाईल

Hyderabad Tour Package : IRCTC चं नवं टूर पॅकेज! 'द सिटी ऑफ पर्ल्स' हैद्राबादला फिरता येणार बजेटमध्ये; आजच करा फॅमिली ट्रिप प्लान

Hyderabad Family Trip : IRCTC ने तुमच्यासाठी हैद्राबादचे उत्तम टूर पॅकेज आणले आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package : पावसाळा म्हटलं की, आपल्याला प्रत्येकाला फिरण्याचे वेध लागतात. यासाठी आपण अनेक नवनवीन ठिकाणे शोधत असतो. वीकेंडचा काळ अधिक मस्त घालवण्यासाठी आपण फॅमिली बजेट प्लान करत असतो.

जर तुम्ही मुलांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लान करत असाल आणि कमी पैशात तुम्हाला फिरायचे असेल तर IRCTC हा प्लान तुमच्यासाठी उत्तम ठरेल. IRCTC ने तुमच्यासाठी हैद्राबाद उत्तम टूर पॅकेज आणले आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

1. कसा असेल पॅकेज

  • पॅकेजचे (Package) नाव- रामोजी माजी मुंबईसह स्प्लेंडिड हैदराबाद

  • पॅकेज कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस

  • प्रवास (Travel) मोड - ट्रेन

  • कुठे फिरता येईल? - फिल्म सिटी, गोलकोंडा किल्ला, कुतुबशाही मकबरा, सालारजंग संग्रहालय

2. या सुविधा मिळतील

  • येण्या-जाण्याचे तिकीट दिले जाईल.

  • राहण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल.

  • जेवणाची सोय असेल.

  • तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा देखील मिळेल.

3. प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागतील ?

  • या ट्रिपमध्ये 3AC आणि स्लीपर क्लासच्या आधारे भाडे द्यावे लागेल.

  • जर तुम्ही या ट्रिपमध्ये एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 3AC साठी 26,900 रुपये आणि स्लीपर क्लाससाठी 23,000 रुपये द्यावे लागतील.

  • दोन लोकांसाठी 3AC ची किंमत 16,800 रुपये असेल, तर स्लीपर क्लाससाठी 13,600 रुपये द्यावे लागतील.

  • तीन लोकांसाठी 3AC मध्ये 10,400 रुपये आणि स्लीपरमध्ये 10,400 रुपये भाडे आहे.

  • तर मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल.

4. IRCTC ने ट्विट करून माहिती दिली-

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती ट्विट करुन शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला हैद्राबादचे प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्ही IRCTC च्या या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

5. अशा प्रकारे तुम्ही बुक करू शकता

या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक (Book) करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात रेखा कोंडे यांना मारहाण

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! चार अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, कोणाची कुठे झाली बदली?

'या' महिन्यात होणार मोठा राजकीय भूकंप? शिवसेना कुणाची, खासदाराने थेट तारीखच सांगितली

Saturday Horoscope: या 5 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

जमीन व्यवहारांवर आता आयकर विभागाची नजर! 2 लाखांवरील व्यवहारांची माहिती थेट सरकारला जाणार

SCROLL FOR NEXT