IRCTC Romantic Tour Package Details Saam Tv
लाईफस्टाईल

IRCTC Honeymoon Package: आईआरसीटीसीचा हनिमून टूर पॅकेज! पार्टनरसोबत फिरा हिमाचल प्रदेशात, पॅकेजचा खर्च किती? पाहा सविस्तर

Shimla, Gulmarg, Guwahati IRCTC Honeymoon Package: उन्हाळा सुरु झाला की, लग्नसराईचा हंगाम सुरु होतो. या काळात अनेक जोडप्यांचे लग्न होते. परंतु अनेकदा लग्नानंतर किंवा हनिमूनला कुठे जायचे हा प्रश्न जोडप्यांना पडतो. त्यासाठी ते शांत ठिकाण निवडण्याचा प्रयत्न करतात.

कोमल दामुद्रे

Shimla, Gulmarg, Guwahati IRCTC Package:

उन्हाळा सुरु झाला की, लग्नसराईचा हंगाम सुरु होतो. या काळात अनेक जोडप्यांचे लग्न होते. परंतु अनेकदा लग्नानंतर किंवा हनिमूनला कुठे जायचे हा प्रश्न जोडप्यांना पडतो. त्यासाठी ते शांत ठिकाण निवडण्याचा प्रयत्न करतात.

लग्नानंतर कपल्सला (Couple) बाहेर फिरण्याची ऑफिशियल परवानगी मिळते. अशातच लग्नानंतर हनिमूनला जाण्याची क्रेझ कपल्समध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. पण जर तुम्हाला स्वस्तात मस्त बजेटमध्ये फिरायचे (Travel) असेल तर कमी खर्चात स्नो वर्ल्डचा आनंद घेऊ शकता. तुम्हालाही फिरायला जायचे असेल तर जाणून घेऊया IRCTC च्या टूर पॅकेजबद्दल.

1. शिमला

शिमलाला फिरायला जायचे असेल तर २२ मार्चपासून टूर पॅकेज आहे. हा पॅकेज लखनऊपासून सुरु होईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला चंदीगड, कुफरी आणि शिमला या ठिकाणी फिरता येईल. हे टूर पॅकेज ५ रात्री ६ दिवसांसाठी असणार आहे. कपल्ससाठी प्रति व्यक्तीला २३,२०० रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये हॉटेल, ट्रेन आणि जेवणाचा खर्च केला जाईल.

2. गुवाहाटी

जर तुम्हाला आसाममध्ये फिरायचे असेल तर तुम्ही ११ एप्रिलला तिकीट बुक करु शकता. हे पॅकेज तुम्हाला चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, मावलिनॉन्ग आणि शिलाँग या ठिकाणी फिरता येईल. हे टूर पॅकेज ६ रात्री ७ दिवसांसाठी असणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटद्वारे प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये प्रति व्यक्तीला ४६,७०० रुपये मोजावे लागणार आहे.

3. गुलमर्ग

हिल स्टेशनला फिरायचे असेल तर तुम्ही पार्टनरसोबत गुलमर्गला जाऊ शकता. हे पॅकेज २० एप्रिलपासून चंदीगड येथून सुरु होईल. पॅकेजमध्ये तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला भेट देता येईल. या सुंदर खोऱ्यांमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला ५ रात्री ६ दिवस फिरता येईल. हा प्रवास फ्लाइटने करता येणार आहे. कपल्ससाठी यामध्ये तुम्हाला ३२,२०० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT