iOS 17 update: अॅपल आगामी वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये (WWDC) मध्ये आपले नवीन iOS 17 सॉफ्टवेअर व्हर्जन सादर करणार आहे. जून महिन्यात वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स होणार आहे. या कार्यक्रमाला अवघे दोन महिने शिल्लक असले तरी, नेहमीप्रमाणेच काही लीकच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
यातच एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, Apple iOS 17 सॉफ्टवेअर व्हर्जन लॉन्च करणार आहे. मात्र काही iPhones या व्हर्जनला सपोर्ट करणार नाहीत. यामध्ये कोणते आयफोन आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...(Latest Marathi News)
या iPhones ला iOS 17 सपोर्ट मिळणार नाही
MacRumors च्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X ला अपकमिंग iOS सपोर्ट मिळणार नाही. यासोबतच फर्स्ट जेनच्या iPad Pro 9.7-इंच, iPad Pro 12.9-इंच आणि पाचव्या Gen च्या iPad ला देखील iPadOS 17 अपडेट मिळणार नाही.
iOS 17 स्पोर्ट का मिळणार नाही?
या आयफोनला iOS 17 स्पोर्ट का मिळणार नाही, यामागे एकमेव कारण म्हणजे ही मॉडेल्स बरीच जुनी आहेत. नवीन फीचर्स आणि जोडण्यासाठी नवीन हार्डवेअर आवश्यक आहे. सर्व सॉफ्टवेअर ज्यांना अपडेट मिळणार नाही, ते नोव्हेंबर 2015 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान लॉन्च केले गेले आहेत.
iPhone XS
iPhone XS Max
iPhone XR
iPhone 11 सीरीज
iPhone 11 Pro सीरीज
iPhone 12 सीरीज
iPhone 12 Pro सीरीज
iPhone 13 सीरीज
iPhone 13 Pro सीरीज
iPhone 14 सीरीज
iPhone 14 Pro सीरीज
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.