International Dog Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

International Dog Day 2023 : कुत्रा पाळा आणि आयुष्यातील ताणतणाव पळवा, कसे ते पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Care Dog : 2004 पासून आंतराराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जातो. प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावे हा यामागील मुख्य उद्धेश आहे. आज आम्ही तुम्हाला कुत्र्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देणार आहोत.पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबाबतही आपण नेहमी अपडेट असायला हवे.

नेहमी त्यांना योग्य आणि निरोगी (Healthy) अन्न खायला द्यायला हवे. बरेच लोक त्यांना प्रेमाने असे काही खाद्यपदार्थ देतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. अनेकदा आपण कुत्र्यांना चॉकलेट, कँडीयांसारखे गोड पदार्थ खायला देतो. यावेळी याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल. याचा विचार करत नाही. अशा गोष्टी कधीच कुत्र्यांना खायला देऊ नका. त्याचे दुष्परिणाम होतील.

कांदा

काही प्रमाणात कांदा लसूण हा कुत्र्यांसाठी हानिकारक असू शकतो. त्यामुळे कुत्र्याला अ‍ॅनिमिया आजार (Disease) होण्याची शक्यता असते.

अ‍ॅवोकॅडो

अ‍ॅवोकॅडोमध्ये पर्सिन नावाचे अ‍ॅसिड असते. हे कुत्र्याने खालल्याने त्याला उलट्या होऊ शकतात.

चॉक्लेट

चॉक्लेटमध्ये थिओब्रोमाइन असते. जे कुत्र्यांसाठी अतिशय हानिकारक आहे. यामुळे कुत्र्यांमध्ये हृदयाची समस्या (Problem) आणि मृत्यूदेखील होऊ शकतो.

कच्ची अंडी

कच्च्या अंड्यामध्ये असलेल्या ई. कोलाय बॅक्टेरिया असते त्यामुळे कुत्र्यांना विषबाधा होऊ शकते.

कँडी

xylitol असलेली कोणतीही कँडी, गम किंवा टूथपेस्ट तुमच्या कुत्र्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कुत्र्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे कुत्र्याच्या मूत्रपिंडांना नुकसान होते.

कॅफिन

चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आढळते, जे तुमच्या कुत्र्याच्या जीवासाठी हानिकारक असते. जर चुकून तुमच्या कुत्र्याने ते सेवन केले असेल तर त्याला ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे घेऊन जा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT