Colonel Sapna Rana Saam Tv
लाईफस्टाईल

Inspiring Story: हिमाचल प्रदेशमधून पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर, सपना राणा यांचा प्रेरणादायी प्रवास

Colonel Sapna Rana: मेहनत करण्याची ताकद आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यश हे मिळवतो. असंच यश हिमाचल प्रदेश येथील छोट्या गावातील सपना राणा यांनी मिळवलं आहे. सपना या आर्मीत कर्नल म्हणून कार्यरत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Inspiring Story Of Colonel Sapna Rana:

देशासाठी काम करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देतात. देशासाठी लढायला आणि वेळप्रसंगी स्वतः च्या जिवाची चिंता न करणारे लोक म्हणजे भारतीय सैनिक. अनेकांची भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा असते. त्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. अशीच मेहनत कर्नल सपना राणा यांनी केली आणि आज त्या आर्मीमध्ये कर्नल म्हणून कार्यरत आहे.

मेहनत करण्याची ताकद आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यश हे मिळवतो. असंच यश हिमाचल प्रदेश येथील छोट्या गावातील सपना राना यांनी मिळवलं आहे. (latest News)

सपना राणा यांनी लहानपणापासूनच खूप मेहनत केली. सपना या हिमाचल प्रदेशमधील एका लहान गावात राहत होत्या. त्यांची परिस्थिती बिकट होती. पैसे वाचवण्यासाठी त्या कॉलेजला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंत ट्रेकिंग करत जायच्या. त्यांचे आयुष्य खूप खडतर परिस्थितून गेले. सपना यांचे वडिल शिक्षक होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी सपना आणि तिचे आईवडिल सोलनला राहायला गेले. त्यांनी तेथे त्यांनी त्यांचे आयुष्य नव्याने सुरु केले.

सपना यांना शिमल्यात एमबीएसाठी अॅडमिशन मिळाले. त्यानंतर मी सिव्हील सर्व्हिसेसच्या परिक्षांची तयारी केली. त्याच्या मध्ये मी संयुक्त संरक्षण सेवा परिक्षेला (Combined Defence Services Exam) बसले. त्यानंतर मी ट्रेनिंगसाठी सिलेक्ट झालीट, अस त्यांनी सांगितले . यानंतर सपना यांचा आर्मीतील प्रवास सुरु झाला. 'भारतीय सैन्यात कमाडिंग ऑफिसर हे पद मिळवणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे', असेही कर्नल सपना यांनी सांगितले.

सपना या २००४ मध्ये आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत होत्या. त्या आज ईशान्येकडील आर्मी सर्व्हिस कॉर्प्स बटालियनचे (Army Service Corps Battalion) नेतृत्व करतात. त्यांचे कामापर्ती असलेले समर्पण आणि उत्कृष्टतेला तीन प्रतिष्ठित सीओएएस आणि जनरल ऑफिसर कमांडिंग कमंडेशन कार्ड्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कर्नल सपना राणा यांनी अगदी खडतर प्रवासातून हे यश मिळवले आहे. आज त्या देशासाठी आपल्य़ा प्राणांची आहुती देण्यासाठीही तयार आहेत. त्यांचा हा प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT