Sleep Issue yandex
लाईफस्टाईल

Insomnia Sleep Problem : तुम्हालाही झोप लागत नाही का? मग ट्राय करा 'या' सिंपल ट्रिक्स, वाचा

Insomnia Sleep Disorder: झोप न येणे हे आरोग्याच्या कोणत्याही गंभीर समस्येचे कारण असू शकतं. झोप न येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकता. जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम जितका महत्त्वाचा आहे, तितकीच रोज रात्री चांगली आणि गाढ झोप घेणेही महत्त्वाचे आहे. बऱ्याच रिसर्च मधून असे दिसून आले आहे की प्रौढांनी दररोज रात्री किमान 6-9 तास गाढ झोप घेतली पाहिजे. जर तुम्हाला एक रात्र पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा दुस-या दिवशी तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अलिकडच्या वर्षांत झोप न येण्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मोठ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक त्याला बळी पडताना दिसत आहेत. झोप न येणे म्हणजेच निद्रानास हे आरोग्याच्या कोणत्याही गंभीर समस्येचे कारण असू शकते.

झोपेची समस्या

शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. झोपेच्या वेळी शरीरात अनेक प्रकारच्या केमिकल रिअॅक्शन घडत असतात. यामध्ये हार्मोन्स तयार होतात जे तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. बदलती जीवनशैली, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे अनेक लोक झोप न येण्याच्या समस्येशी झुंजत आहेत.

झोपेच्या गोळ्यांची सवय लावू नका

अनेकदा लोक झोपेच्या समस्येवर मात करण्यासाठी 'मेलाटोनिन' गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. मेलाटोनिन हा हार्मोन आहे जो तुमचा मेंदू अंधाराच्या प्रतिसादात तयार करतो. हे तुमच्या सर्केडियन रिदम आणि झोपेमध्ये मदत करते. मेलाटोनिनची पातळी नियंत्रित करण्यासाठी बाजारात अनेक गोळ्या उपलब्ध आहेत. मात्र, या सप्लिमेंटवर अवलंबून राहणे टाळावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

झोप न येण्याची समस्या अनेक प्रकारे हानिकारक आहे. सततच्या झोप न येणे यामुळे थकवा आणि ऊर्जेचा अभाव तर होतोच शिवाय तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचा, लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो. झोपेच्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. यामुळे, तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी, डिप्रेशन आणि चिडचिडेपणा या समस्यायांचा धोका वाढतो. दीर्घकाळ झोपेच्या समस्यांमुळे डिमेंशिया आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.

विश्रांती कशी मिळवायची?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, औषधांवर अवलंबून न राहता झोपेची गुणवत्ता सुधारा. यामध्ये नियमित झोपण्याची वेळ राखणे, तुमचे मन मोकळे करण्यासाठी काही अॅक्टिव्हिटी करा. यामध्ये जसे की ध्यान करणे, चांगले म्युझिक ऐकणे, शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह असणे आणि झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीन किंवा उपकरणांपासून दूर राहणे यांचा समावेश होतो. झोप न लागणे आणि कामाचे तास बदलणे किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणे यामुळे झोपेच्या रुटीनवर परिणाम होतो. मोबाईल कॉम्प्युटरसारख्या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनच्या उत्पादनात अडथळा आणतो. ज्यामुळे झोपेला व्यत्यत निर्माण होतो. या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची पहिली झलक; चक्क लोगो बदलला, पाहा VIDEO

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

SCROLL FOR NEXT