McAfee Study  yandex
लाईफस्टाईल

Cyber Scam: भारतीय लोकांना दररोज येतात १२ फेक मेसेज; दर ११ सेकंदात तयार होते एक Scam साईट्स

McAfee Study : मॅकॅफीने केलेल्या अभ्यासानुसार, भारतीयांना टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियाद्वारे दररोज सुमारे १२ स्कॅम मेसेज मिळत असतात.

Bharat Jadhav

McAfee's Scam Message Study On Scam Messages:

सध्या ऑनलाइन स्कॅमच्या घटना वाढल्या आहेत. या स्कॅमवर मॅकॅफीने एक अभ्यास केला असून त्याचा अहवाल जाहीर करण्यात आलाय. McAfee Corp ही ऑनलाइन संरक्षण देणारी संस्था आहे. McAfee Corpने ग्लोबल स्कॅम मेसेज स्टडीचा पहिला अहवाल सादर केलाय. (Latest News)

स्कॅम मेसेज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) द्वारे होणारे स्कॅम वाढले आहेत. यामुळे जगभरातील ग्राहकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन भारतासह ७ देशांतील ७ हजारहून अधिक प्रौढांचं सर्व्हे करण्यात आलंय. AI हे स्कॅमरचे आवडते साधन आहे, जे सायबर गुन्हेगारांना स्कॅम मेसेजचे प्रमाण आणि अत्याधुनिकता वाढविण्यात मदत करतं. याच्या मदतीने फिशिंग आणि स्कॅम मेसेज तयार करण्याचा वेग वाढलाय. प्रत्येक ११ सेकंदांला एक नवीन फिशिंग साइट तयार केली जाते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगभरात इंटरनेट युझर वाढले आहेत. त्यात स्कॅम करणारे देखील वाढले आहेत. यामुळे देशांमधील ९०० दशलक्ष इंटरनेट वापरकरत्यांचे ऑनलाइन संरक्षण करणे हा गंभीर विषय बनलाय. मॅकॅफीने केलेल्या अभ्यासानुसार, भारतीयांना टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियाद्वारे दररोज सुमारे १२ स्कॅम मेसेज मिळत असतात. हे टेक्स्ट मेसेज, ईमेल,सोशल मीडिया द्वारे पाठवलेले मेसेज खरे की खोटे हे तपासण्यासाठी सरासरी भारतीय ग्राहक आठवड्यातील १.०८ तास वाया घालवतो.

अभ्यासानुसार, सुमारे ८२ टक्के भारतीय या फेक मेसेजला क्लिक करतात किंवा फिशिंगमध्ये अडकत असतात. हे मेसेज इतके चांगल्या प्रकारे लिहिले असतात. त्यात कोणतीच चूक आढळत नाही. यामुळे हे मेसेज खोटी आहेत, असा संशय येत नसल्याचं ४९ टक्के भारतीयांनी या स्कॅम मेसेजविषयी बोलताना सांगितले.

या मेसेजमध्ये अनेकजण हे बनावट नोकरीविषयी मेसेज, बँकेचे अलर्टला बळी पडतात. यात ६९ टक्के लोक हे नोकरीच्या मेसेजला क्लिक करून बळी ठरत असतात. तर ५२ टक्के लोक हे बँकेच्या मेसेजवर क्लिक करतात. या स्कॅम मेसेजमुळे भारतीय इंटरनेट युझर्सला खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यात एआयमुळे स्कॅम मेसेज खोटे आहेत की खरे हे ओळखणं खूप अवघड झालं आहे.

७३ टक्के लोकांना असं वाटतं ह्या मेसेजची सत्यता पडताळणी करण्याऐवजी क्युब खेळणं सोपं असतं. हे स्पॅम मेसेज लोकांचा वेळ, ऊर्जा आणि त्यांचे आर्थिक नुकसान करणारे असतात. त्यामुळेच एआय स्कॅमला हरवण्यासाठी आपल्या सर्वांना AI समजणं आवश्यक आहे. प्रगत AI तंत्रज्ञानाने सुसज्ज होणं आवश्यक आहे. जे रिअल टाइममध्ये स्कॅमचे मेसेज थांबवतील आणि ब्लॉक करू शकू. McAfee लोकांची गोपनीयता, ओळख आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी उपाय देत आहे. प्रत्येकासाठी ऑनलाइन जग अधिक आनंददायक बनविण्यात मदत करत आहे,” असं McAfeeचे प्रोडक्ट एसव्हीपी रोमा मजुमदार म्हणाले.

McAfeeच्या संशोधनात फेक आणि स्कॅमचे मेसेज कसे ओळखायचे हे सांगितले आहे. ज्या लोकांचा सर्व्हे करण्यात आला त्यातील ६० टक्के लोकांच्या मते स्कॅम मेसेज ओळखणं खूप कठीण आहे. कारण त्यात कोणत्याच प्रकारचे टायपिंग चूक, किंवा शब्दांमध्ये चुका झालेल्या नसतात. हॅकर्स हे मेसेज विश्वासार्ह वाटण्यासाठी एआय टूलचा वापर करतात. तर ४९ टक्के लोक म्हणतात हे मेसेज खूप वैयक्तिक समस्या समजून बनवण्यात आलेले असतात.

या ट्रिक द्वारे जाळ्यात सापडणाऱ्या नेटकऱ्यांची टक्केवारी

  • तुम्ही बक्षीस जिंकले आहे!– ७२ टक्के

  • खोट्या नोकरीच्या सूचना किंवा ऑफर – ६४ टक्के

  • बँक अलर्ट संदेश- ५२ टक्के

  • इंटरनेट युझरने न केलेल्या खरेदीची माहिती – ३७ टक्के

Netflix (किंवा इतर ) अॅपच्या सभासद होण्याचे अपडेट यात – ३५ टक्के लोक बळी पडतात.

एखाद्या वस्तूची किंवा पार्सलचे खोटे मिस्ड डिलिव्हरी , किंवा डिलिव्हरी समस्यांचे मेसेज – २९ टक्के

Amazon सुरक्षा सूचना, किंवा खाते अपडेट संबंधित सूचना मेसेज – २७ टक्के

दरम्यान अशा मेसेजवर क्लिक करावे की नाही हा प्रश्न न सोडवता येणारा आहे. परंतु स्कॅम मेसेजच्या वाढलेल्या प्रमाणामुळे ३७ टक्के लोकांचा डिजिटल पद्धतीने येणाऱ्या मेसेजवरील विश्वास उडालाय. डिजिटल स्कॅमपासून संरक्षण कसे करावे याचे ज्ञान नसल्यानं हे होत आहे. तर बहुतेक भारतीयांना ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य गोष्टी करत आहेत की नाही हे त्यांनाच माहित नाही. दरम्यान अनेकजण खालीलप्रमाणे या स्कॅमपासून स्वतःला वाचवतात.

  • २८ टक्के लोक ईमेलकडे दुर्लक्ष करतात, जेव्हा त्यांना एखादा ईमेल किंवा टेक्स्ट प्राप्त होतो तो त्यांना स्कॅम वाटत असते.

  • २८ टक्के जण मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीला ब्लॉक करतात.

  • ३१ टक्के जण संशयित घोटाळ्याच्या मेसेजची तक्रार करतात.

स्कॅम मेसेजपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

सायबर गुन्हेगार फिशिंग ईमेल किंवा बनावट साइट्स वापरून लोकांना क्लिक करण्यास प्रलोभन देतात. त्यामुळे तुम्ही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लिंकवर क्लिक करण्‍यासाठी सांगणार ईमेल आला तर त्यावर क्लिक करणे पूर्णपणे टाळणे चांगले. लक्षात ठेवा हे मेसेज खरे आणि चांगले फायदा देणारे वाटत असतात. बँक खाते बंद करणारे किंवा इतर धमकी देणाऱ्या मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी थोडा विचार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT