भारत आणि पाकिस्तानचा इतिहास समान असला तरी विकास वेगवेगळा
भारतीय महिलांची सरासरी उंची पाकिस्तानी महिलांपेक्षा अधिक
पोषण, आरोग्यसेवा आणि जीवनशैली हा मुख्य फरक
भारताचे विभाजन होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान हा एकच देश होता. जेनेटिक्स, संस्कृती आणि राहणीमान सारखेच होते. पण आज शारीरिक विकासातील फरकामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. दोन्ही देशांपैकी कोणत्या देशातील महिला उंच आहेत? भारतीय मुली खरोखरच पाकिस्तानी मुलींपेक्षा उंच आहेत का आणि का? हे जाणून घ्या.
WorldData.info नुसार, भारतातील महिलांची सरासरी उंची अंदाजे १५२ ते १५५ सेंटीमीटर आहे. पाकिस्तानमध्ये महिलांची सरासरी उंची अंदाजे १५४ सेंटीमीटर आहे. हा फरक फक्त एक ते दोन सेंटीमीटर आहे. मात्र गेल्या काही दशकांमधील ट्रेंडवरून असे दिसून येते की भारतीय महिलांची सरासरी उंची पाकिस्तानी महिलांपेक्षा वेगाने वाढलीय.
बालपण आणि पौगंडावस्थेतील उंची निश्चित करण्यात पोषणाची मोठी भूमिका असते. भारतात आर्थिक विकास, शहरीकरण आणि मध्यान्ह भोजन कार्यक्रम, आयसीडीएस आणि मातृ पोषण योजनांसारख्या सरकारी कार्यक्रमांमुळे मुलींमध्ये कॅलरी आणि प्रथिनांचे प्रमाण वाढलं. दूध, डाळी, फळे आणि फोर्टिफाइड अन्न यांचा समावेश असलेला संतुलित आहार अधिक सहज उपलब्ध आहे.
पाकिस्तानमध्ये गरिबी, अन्न सुरक्षा आणि काही भागात, लिंग-आधारित पोषणावर दुर्लक्ष यामुळे मुलींच्या आरोग्यावर परिणाम करते. पाकिस्तानमध्ये मुलींना मुलांपेक्षा कमी अन्न मिळते. वाढत्या काळात सततचे कुपोषण उंचीच्या क्षमतेवर थेट मर्यादा घालते.
बालपणीच्या आरोग्याचा उंचीवर लक्षणीय परिणाम होत असतो. भारताने लसीकरण, स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवली आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कमी संसर्ग झाल्यामुळे शरीराला रोगांशी लढण्याऐवजी वाढीसाठी ऊर्जा वापरता येते. पाकिस्तानमध्ये मर्यादित आरोग्यसेवा, अशक्तपणा आणि इतर आजारांचे उच्च दर आणि ग्रामीण भागातील अस्वच्छता यामुळे शारिरिक विकासाचे परिणाम कमकुवत होतात. बालपणात वारंवार आजारी पडणे हे कमी उंचीचे सर्वात सामान्य कारण आहे.
पाकिस्तानमध्ये विशेषतः ग्रामीण आणि रूढीवादी भागात बालविवाह अजूनही सामान्य आहे. मुलींचे शरीर पूर्णपणे विकसित होण्यापूर्वीच त्यांचे लग्न लावून दिले जातात. आणि आई होतात, तेव्हा त्यांचा स्वतःचा विकास अकालीच खुंटत असतो. भारतालाही या समस्येचा सामना करावा लागला आहे.पण कडक कायदे, मुलींसाठी शिक्षण व्यवस्था आणि शहरांकडे स्थलांतर यामुळे अनेक राज्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.