Indian Railways Canva
लाईफस्टाईल

Indian Railways: रेल्वेकडून मिळतेय 20 रुपयात 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, अशी करा बुकिंग

वाढत्या थंडी आणि धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या तासनतास उशिराने धावतात.

कोमल दामुद्रे

Indian Railways : हिवाळा म्हटलं की, अनेक पर्यटकप्रेमी फिरायला जाण्याचा प्लान करतात. या काळात कडाक्याच्या थंडीसोबतच आपल्याला इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशातच वाढत्या थंडी आणि धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या तासनतास उशिराने धावतात.

या गाड्यांचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर किंवा 'रेल्वे रिटायरिंग रूम'मध्ये ट्रेनची वाट पाहत वेळ घालवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. रेल्वेच्या 'रिटायरिंग रूम' (RR) च्या सुविधेबद्दल सर्वांनाच माहिती नाही. RR साठी 20 ते 40 रुपये देऊन तुम्ही सोयीस्करपणे ट्रेनची वाट पाहू शकता.

1. 5 स्टार हॉटेल रूम सुविधा

रेल्वेच्या (Railway) रिटायरिंग रूममध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतात ज्या 5 स्टार हॉटेलच्या रूममध्ये आहेत. आपल्याकडे कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असल्यास, आपण 'रिटायरिंग रूम' बुक करू शकता. यासाठी तुम्हाला 48 तासांसाठी फक्त 40 रुपये शुल्क भरावे लागेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर रिटायरिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

2. प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची व्यवस्था

हे बुक करण्यासाठी, आपल्याकडे कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असणे आवश्यक आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूम (Room) उपलब्ध आहेत. तुम्ही तिकिटाच्या पीएनआर क्रमांकाद्वारे रिटायरिंग रूम बुक करू शकता. रिटायरिंग रूम एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या असतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवाशांना ही सुविधा दिली जाते.

Hotels Room

3. रिटायरिंग रूम कशी बुक करावी

  • रिटायरिंग रूम बुक करण्यासाठी, आपले तिकीट कन्फर्म किंवा आरएसी असणे आवश्यक आहे.

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेच्या https://www.rr.irctctourism.com/#/home या वेबसाइटवर (Website) जावे लागेल.

  • येथे तुम्ही रिटायरिंग फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, पीएनआर नंबरच्या मदतीने तुमचे बुकिंग करा.

  • आम्ही तुम्हाला सांगतो की एका पीएनआर नंबरवर फक्त एक खोली बुक केली जाऊ शकते.

4. रेंटवर

IRCTC द्वारे PNR नंबरच्या आधारे वाटप केलेल्या रिटायरिंग रूमसाठी, 24 तासांसाठी 20 रुपये आकारले जातात.

शयनगृहासाठी तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतील.

जर तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर तुम्हाला 48 तासांसाठी 40 रुपये मोजावे लागतील.

या खोल्या जास्तीत जास्त 1 तास ते 48 तासांच्या कालावधीसाठी बुक केल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांना हक्काचं घर मिळणार, वरळीत म्हाडा बांधणार २ गगनचुंबी टॉवर्स; एक ८५ तर दुसरा ५८

Makyacha Chivda Recipe: मक्याचा कुरकुरीत चिवडा घरी कसा बनवायचा?

Dharmendra : धर्मेंद्र राजकारणात उतरले, खासदारही झाले, पण निवडणुकीत न उतरण्याची घेतली शपथ, नेमकं झालं काय होतं?

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २२ जण जखमी

Dharmendra : पंजाब का मुंडा कसा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन'? धर्मेंद्र यांचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT