Chinese Apps Ban In India Saam Tv
लाईफस्टाईल

Chinese Apps Ban: केंद्र सरकारकडून 'या' 54 चीनी अ‍ॅप्सवर बंदी! काय आहे कारण?

भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या 54 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालत भारत सरकारने नवीन आदेश जारी केला आहे.

वृत्तसंस्था

Chinese Apps Ban In India: भारत सरकारने (Government Of India) 54 चीनी अ‍ॅप्सवर देशात बंदी घातली आहे. याबद्दलची माहिती या घटनेची संलग्न असलेल्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. यावेळी अधिका-यांनी सांगितले की, केंद्र सरकारने भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका असणाऱ्या 54 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत. यापैकी बरेच अ‍ॅप्स हे टेंसेंट (Tencent), अलीबाबा (Alibaba) आणि गेमिंग कंपनी नेटइज (NetEase) सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान (Chinese Technology) कंपन्यांचे आहेत. 2020 मध्ये टिकटॉक सारख्या अनेक अ‍ॅप्सवर घातलेल्या बंदीनंतर, या अ‍ॅप्सचे पुनर्ब्रँडिंग करून आणि भारतात लॉन्च करण्यात आले होते.

त्या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (Ministry of Electronics and IT) या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे कारण की हे अ‍ॅप्स भारतीय वापरकर्त्यांचा संवेदनशील डेटा (Private Data) चीनसारख्या परदेशात हस्तांतरित करत आहेत. या मंत्रालयाने गुगलच्या प्लेस्टोअरसह (Google Play Store) टॉप अ‍ॅप स्टोअरनाही हे अ‍ॅप ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, '54 अ‍ॅप्सवर भारतात प्लेस्टोअरच्या माध्यमातून वापरण्यापासून आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत.' IT मंत्रालयाने नवीन आदेश लागू करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.

आत्तापर्यंत 224 अ‍ॅप्स वर बंदी;

जून 2020 मध्ये भारताने चिनी कंपन्यांच्या अ‍ॅप्सवर पहिल्यांदा बंदी घातली होती. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या चकमकीत चीनचे 40 सैनिकही मारले गेले. त्याच वेळी, जून 2020 मध्ये चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारतात आतापर्यंत 224 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या वेळेसभारत सरकारने 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली, ज्यामध्ये Tiktok, Shareit, WeChat, Helo, Like, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन्सचा समावेश होता.

कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी?

ANI वृत्तसंस्थेनुसार, 54 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात ब्युटी कॅमेरा समाविष्ट आहे: स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा-सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, सेल्सफोर्स एंटरटेनमेंटसाठी कॅमकार्ड, आयलँड 2: एसेस ऑफ टाईम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनमोजी चेस, ऑनमोजी अरेना, अॅपलॉक, ड्युअल स्पेस. एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी बरेच अ‍ॅप्स टेनसेंट आणि अलीबाबासारख्या कंपन्यांचे आहेत. या अ‍ॅप्सनी त्यांची मालकीही लपवली आहे. ते हाँगकाँग (HongKong) किंवा सिंगापूर (Singapore)सारख्या देशांमधून देखील होस्ट केले जात आहेत, परंतु डेटा अखेरीस चीनमधील सर्व्हरवर जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT