India Post GDS Bharti 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट खात्यात हजारो जागांची भरती

India Post GDS Bharti 2022: २ मे २०२२ पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत ५ जून २०२२ पर्यंतची आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी पास उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय पोस्ट खात्याने (India Post GDS Recruitment 2022) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत ३५ राज्यांमध्ये तब्बल ३८,९२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय डाक विभागाच्या indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करू शकता. या पदांसाठी २ मे २०२२ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

भारतीय पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार शाखा पोस्टमास्टर (बीपीएम), सहायक शाखा पोस्टमास्तर (एबीपीएम) आणि डाक सेवक या पदाच्या तब्बल ३८,९२६ जागांसाठी ही भरती होणार आहे. निवड समितीने तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर ही भरती आधारित असेल.

वयोमर्यादा आणि पात्रता

पोस्ट विभागाच्या या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) १० वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय १८ पेक्षा कमी आणि ४० पेक्षा जास्त नसावे. (विविध श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.)

इतका मिळेल पगार

शाखा पोस्टमास्टर या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १२,००० रुपये वेतन दिले जाईल. तर इतर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १०,००० रुपये इतके वेतन मिळेल. दरम्यान, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १०० रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागेल. २ मे २०२२ पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत ५ जून २०२२ पर्यंतची आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

– सर्वप्रथम पोस्ट विभागाच्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

– त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ‘स्टेज १ नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.

– पुढे नोंदणी फॉर्म भरणे सुरू करा. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

– अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावे लागेल.

– शुल्क भरल्यानंतर इंडिया पोस्ट GDS भर्ती २०२२ अर्ज सबमिट करा.

– भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT