Independence Day 2022, Hosting Indian flag, Rules See Details in Marathi  Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Flag Hosting Rules : ध्वजवंदन करताना या गोष्टी लक्षात ठेवा, तिरंगा फडकावण्याचे नियम जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Indian Flag Hoisting Rules : १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्यासाठी देशातील अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं होतं. इंग्रजांनी हा देश सोडावा, यासाठी अनेक आंदोलने, चळवळी झाल्या. या आंदोलनांमध्ये देशातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देश स्वातंत्र्य झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्यानंतर दरवर्षी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करतात. याशिवाय १५ ऑगस्टला सरकारी कार्यालये आणि शाळा (School)-कॉलेजांमध्ये ध्वजवंदन केले जाते.

मात्र, ध्वजवंदन करण्याची योग्य पद्धत आणि नियम काय आहेत? ध्वजवंदन कसे केले जाते? हे ठाऊक आहे का? जाणून घेऊयात १५ ऑगस्टला ध्वजवंदन करण्याचे नियम...

भारताचा राष्ट्रीय ध्वज -

भारताचा (India) राष्ट्रीय ध्वज हा तीन रंगांचा आहे. राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा म्हणतो. तिरंग्याच्या सर्वात वरच्या बाजूला केसरी, मध्यभागी पांढरा आणि सर्वात खालच्या बाजूस हिरवा रंग आहे. पांढऱ्या रंगावर अशोक चक्र आहे.

ध्वजवंदन आणि तिरंगा फडकावणे यातील फरक -

१५ ऑगस्टला ध्वजवंदन केले जाते आणि २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकावला जातो. ध्वजवंदन आणि झेंडा फडकावणे या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. जेव्हा तिरंगा खालील बाजूने दोरीच्या साह्याने खेचून फडकावला जातो, तेव्हा ध्वजवंदन म्हटलं जातं. मात्र, २६ जानेवारी रोजी ध्वज आधी वरच्या बाजूला बांधला जातो. तिथेच तो फडकावला जातो. त्याला ध्वज फडकावणे म्हटलं जातं. (Independence Day 2022)

ध्वजवंदनाचे नियम -

भारतीय ध्वज हाताने कातलेला, सूती, रेशीम किंवा खादी कपड्यापासून हाताने विणलेला असावा. ध्वजाची लांबी आणि रुंदी ही ३:२ अशी असावी.

ध्वजवंदन करताना झेंडा अर्धवट झुकलेला असताना फडकावू नये. कोणताही आदेश नसताना तिरंगा अर्ध्यावर फडकावला जाऊ शकत नाही.

कुणाला सलामी देण्यासाठी तिरंगा झुकवला जाऊ शकत नाही.

राष्ट्रीय ध्वजामध्ये कोणत्याही प्रकारचे छायाचित्र, पेंटिंगचा वापर करू नये.

फाटलेला आणि मळलेला झेंडा प्रदर्शित करू शकत नाही.

राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकत नाही.

कागदांचा तिरंगा असेल तर, तो योग्य ठिकाणी ठेवावा.

तिरंगा फडकावण्याची योग्य वेळ -

राष्ट्रीय ध्वज फडकावण्याची योग्य वेळ असते. सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आधी ध्वजवंदन करता येऊ शकतं. सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी तिरंगा उतरवायला हवा. तिरंगा नेहमी अशा जागी फडकवा, जेणेकरून तो सगळ्यांना स्पष्टपणे दिसेल.

राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला किंवा अवमान होईल अशी कृती केली तर, त्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच संबंधिताला तुरुंगवास आणि दंड अशा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT