Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss : शरीरातील चरबी वाढली आहे ? तज्ज्ञ सांगताहेत, रामबाण उपाय

प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Weight Loss : प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य कित्येक लोकांच्या (People) तोंडून ऐकलं असेल. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट (Workout) काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.

पोटाची चरबी कशी कमी करता येईल यावर आयुर्वेदिक डॉक्टर श्याम वीएल यांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे. या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लाइफ स्टाइलमध्ये काही बदल केले तर पोटाची चरबी कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करणं म्हणजे तारेवरची कसरत. पण योग्य डाएट आणि व्यायामाच्या सहाय्याने पोटाची चरबी कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स या लेखाच्या आधारे आपण जाणून घेऊया.

साहित्य -

१०० ग्रॅम मेथी, ४० ग्रॅम ओवा, २० ग्रॅम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

कृती -

वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

फायदे :

०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.

०२) हाडे मजबूत होतात.

०३) काम करण्यास स्फूर्ती येते.

०४) डोळे तेजस्वी होतात.

०५) केसांची वाढ होते.

०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.

०७) रक्ताभिसरण चांगले होते.

०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.

०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

१०) बहिरेपणा दूर होतो.

११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.

१२) अलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.

१३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.

१४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.

१५) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.

१६) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो.

१७) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.

१८) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.

१९) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टॲटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

२०) त्वचेचा रंग काळवडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.

२१) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

Edited By - Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT