Electric Vehicle Fire cases
Electric Vehicle Fire cases Saam Tv
लाईफस्टाईल

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्या; BISने केली 'ही' तत्त्वे लागू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली :भारतीय मानके ब्युरोने (BIS),ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय मानके सेटिंग एजन्सीने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये आवश्यक किमान मानके राखण्यासाठी नवीन मानके तयार करण्यात आले आहेत. भारतीय मानके ब्युरोने इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरीसाठी कार्यप्रदर्शन मानके अशा वेळी लॉंच केली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

बीआईएसने काढलेल्या या नवीन मानकांच्या बॅटरीची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि विद्युत कार्यक्षमतेच्या चाचण्या घ्याव्या लागणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी नवीन मानके कमी आणि उच्च तापमानावर चालणाऱ्या बॅटरीसह अनेक भौगोलिक परिस्थितीवर आधारित आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन मानके...

भारतीय मानके ब्युरो अधिकाऱ्यांच्या मते, 'ISO १७८५५ : २०२२' हे मानके लिथियम-आयन ट्रॅक्शन बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या सिस्टीमसाठी विकसित केले गेले आहे. ते ISO १२४०५-४:२०१८ मॉडलनुसार बनवले गेले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त, भारतीय मानके ब्युरो येत्या काही दिवसांत प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांसाठी आणखी दोन बॅटरीसह मानके लॉंच करणार आहे.

आगीच्या घटनांचा तपास...

नुकतेच टाटा नेक्सॉन ईव्ही या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. केंद्राने यापूर्वीच या घटनेच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या आग लागण्याच्या घटनांच्या तपासात केंद्राने स्वत: सहभाग घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, काही इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आग लागल्यानंतर केंद्राने चौकशीचे आदेश दिले होते.

दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच पटीने वाढली...

गेल्या दोन वर्षांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहन विभागातील विक्रीत पाच पटीने वाढ झाली आहे. टाटा मोटर्स ८० टक्क्यांहून अधिक मार्केटसह इलेक्ट्रिक वाहन चारचाकी वाहन विभागात आघाडीवर आहे. दुचाकी विभागात, Hero Electric, Ola Electric आणि Okinawa Autotech सारख्या EV निर्मात्या काही आघाडीच्या कंपन्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT