आजकाल प्रॉपर्टी खरेदी आणि विक्रीवर अनेक नियम लावण्यात आले आहेत. जर तुम्हीही प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आयकर विभागाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुम्ही संपूर्ण माहिती आयकर विभागाला दिली नाही तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ३० लाख रुपयांची मर्यादा आहे. याचप्रमाणे जर तुम्ही परकीय चलन विकत असाल तर १० लाख रुपयांची मर्यादा आहे. या गोष्टी लक्षात ठेवूनच खरेदी किंवा विक्री करा. आज आम्ही तुम्हाला ६ मोठ्या व्यवहाराबद्दल सांगणार आहोत. ज्या गोष्टी आयकर विभाग अर्ज भरताना नमूद करा. अन्यथा तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
जंगम मालमत्तेची खरेदी विक्री
कोणत्याही जंगम मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करत असाल तर आयकर विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ३० लाखांपेक्षा जास्त रक्कमेची जंगम मालमत्ता खरेदी किंवा विक्री करत असाल तर त्याच्या माहिती प्रॉपर्टी रजिस्टरला द्यावी लागेल. तुमच्या परिसरातील प्रॉपर्टी रजिस्टरकडे ही माहिती द्यावी लागेल.
परकीय चलनाची (Foreign Currency)विक्री
एका आर्थिक वर्षात तुम्ही किती परकीय चलन विकता यासाठी एक खास नियम आहे. एका वर्षात तुम्ही जवळपास १० लाख परकीय चलनाची विक्री करु शकता. या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईचा सामना करावा लागेल.
बचत आणि चालू खात्यात ठेव रक्कम
तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका वर्षाला १० लाख रुपयांचा व्यव्हार करु शकता. जर यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार तुम्ही करत असाल तर याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. तर चालू खात्यातून(Current Account)वर्षाला ५० लाखांपर्यंतचा व्यव्हार करु शकता. यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार तुम्ही करत असाल तर याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल.
बँकेत मुदत ठेव(Fixed Deposit)
जर तुम्ही तुमच्या मुदत ठेव खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. एका एफडी खात्यात किंवा अनेक एफडी खात्यात तुम्ही १० लाखांहून अधिक रक्कम जमा करत असाल तर याचीही माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागते. यासाठी बँकेत फॉर्म 61A भरावा लागतो.
क्रेडिट कार्डचे बिल
क्रेडिट कार्डचे बिल १ लाख रुपये रोख रक्कम देऊन भरत असाल तर याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. आयकर विभााग क्रेडिट कार्डच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून असते.
शेअर्स आणि बॉण्डसमध्ये गुंतवणूक
म्युच्युअल फंड, स्टॉक, बॉण्ड किंवा डिंबेचर्समध्ये जर तुम्ही वर्षाच १० लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करत असाल तर याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. वार्षिक माहिती रिटर्न स्टेटमेंटमध्ये तुमच्या सर्व व्यवहारांची माहिती असते. या स्टेंटमेंटमच्या मदतीने टॅक्स अधिकारी तुमच्या व्यव्हराला पकडू शकतात. फॉर्म 26AS च्या भाग E मध्ये तुमच्या सर्व हाय वॅल्यू व्यवहारांची माहिती असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.