how to control cholesterol, Health tips
how to control cholesterol, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थाचा समावेश करा

कोमल दामुद्रे

मुंबई : कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तात असतो जो यकृत तयार करत असतो. आपल्याला आरोग्याला कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते परंतु, ते अधिक प्रमाणात वाढले तर त्याचा त्रासही आपल्याला होतो.

हे देखील पहा -

आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे किंवा बाहेरील पदार्थ (Food) खाल्ल्याने आरोग्यासंबंधीत आपल्याला अधिक तक्रारारी जाणवू लागतात. मांसाहरी व तेलाचे (Oil) पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. कोलेस्ट्रॉलचा स्तर हा आपल्या शरीरात विसाव्या वर्षानंतर वाढू लागतो. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ असून तो आपल्या शरीरातील पेशी व हार्मोन्ससाठी महत्त्वाचा आहे. परंतु, त्याचे प्रमाण वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्याना सामोरे जावे लागते. आर्टरी ब्लॉकेज, स्ट्रोक्स, हृदयविकाराचा झटका व इतर आजारांचा सामना करावा लागतो. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आहारात आपल्याला या पदार्थाचा समावेश करायला हवा.

कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण हे सध्या तरुणांमध्ये ही दिसते आहे. त्यासाठी आपल्या आहारात आपल्याला लसणाचा समावेश करायला हवा. लसणू हा आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पदार्थ आहे. लसणात अनेक गुणधर्म असून आयुर्वेदात त्याला अधिक महत्त्व दिले जाते. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अॅलिसिन आढळतात. ज्याद्वारे खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. याशिवाय लसणात अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळते ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास खूप मदत होते.

लसणाचे सेवन कशाप्रकारे करावे -

१. कच्च्या लसणाच्या कळ्या खाल्ल्याने अशक्तपणा दूर होऊन कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.

२. दररोज रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने वजन कमी करता येते व त्याचा फायदा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी होऊ शकतो.

३. लसूण मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे

४. जेवणात लसूण घातल्याने पचनक्रिया सुरळीत होते. बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढते. लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी सहज नियंत्रित करतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT