Health issue, Diabetes, Benefits of amla  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : मधुमेह - कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांवर मात करायची आहे तर; या ज्यूसचा आहारात समावेश करा

या रसाचे सेवन केल्यास होईल फायदा

कोमल दामुद्रे

मुंबई : मधुमेह व कोलेस्ट्रॉल हा आजार सध्या सर्व सामान्य वाटत असला तरी याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. हे आजार (Disease) आपल्याला आनुवांशिक असतात तर काही आजार आपल्याला हे खाण्यापिण्याच्या सवयीमुळे येतात.

हे देखील पहा -

आयुर्वेदात आवळ्याला अधिक महत्त्व आहे. जीवनसत्त्व समृद्ध असलेले हे आंबट फळ विविध पोषक तत्वांचे भांडार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोरडा किंवा कच्चा खायला आवडतो, तर अनेकांना त्याचा रस प्यायला आवडतो. दिवसभरात आपल्याला याचे सेवन केल्यास फायदा होतो. आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आपली पचनसंस्था देखील सुधारते. तसेच आम्लपित्त, पुरळ, निस्तेज त्वचा, थकवा, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, फुगवणे किंवा इतर कोणत्याही जठरासंबंधी समस्यांमध्ये मदत करते. हा बहुगुणी आवळा अनेक आजारांवर मात कसा करतो हे जाणून घेऊया.

१. आवळा आपली पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते. तसेच ते हृदयासाठी चांगले असते.

२. आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तसेच वजन कमी (Weight loss) करण्यास व राखण्यास मदत होते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचा रस रोज प्यावा.

३. हा रस चवीला आंबट व तुरट असल्यामुळे पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यात वृद्धत्वविरोधी, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल, अँटी-इमेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, यकृतासाठी चांगले आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

SCROLL FOR NEXT