Evening Breakfast Ideas
Evening Breakfast Ideas Saam Tv
लाईफस्टाईल

Evening Breakfast Ideas : संध्याकाळच्या नाश्त्यात 'या' आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा!

कोमल दामुद्रे

Evening Breakfast Ideas : दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जास्त अंतर असल्यामुळे संध्याकाळी भूक लागणे साहजिक आहे. यामुळे लोक संध्याकाळच्या नाश्त्यात तळलेले अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात खातात.

मात्र दररोज अन्हेल्दी खाणे आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात. म्हणून संध्याकाळच्या नाश्त्यात हेल्दी गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. ज्याने आरोग्याला फायदा होईल चला तर मग जाणून घेऊया चविष्ट आणि आरोग्याला (Health) फायदेशीर असलेले पदार्थ जे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

1. मुरमुरे

संध्याकाळच्या नाश्त्यात मुरमुरेचा वापर करून चविष्ट पदार्थ बनवता येतो. भेळ, सुजला, चक्की असे चवदार पदार्थ मुरमुऱ्यापासून तुम्ही बनवू शकता. हे पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या स्नॅकसाठी मुरमुरे हा एक उत्तम पर्याय आहे.

2.उकडलेली अंडी

अंडयांमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) ए, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, आयर्न यासारखे शरीराला आवश्यक पोषकघटक असतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात उकडलेली अंडी तुम्ही खाऊ शकता. उकडलेल्या अंडीवर चार्ट मसाला किंवा मीठ घालून तुम्ही खाऊ शकता.

3. ड्राय फ्रूटस

संध्याकाळी भूक लागल्यावर तुम्ही ड्राय फ्रूटस खाऊ शकता. तुमची थोडीशी भूक भागवण्यासाठी ड्राय फ्रूटस हा उत्तम पर्याय आहे. बदाम,काजू, पिस्ता, अंजीर, मनुके या ड्राय फ्रूटसचा समावेश संध्याकाळीची भूक भागवण्यासाठी करू शकता. ड्राय फ्रूटस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

4. ओट्स

ओट्सला सुपरफूड असण्याचा दर्जा देण्यात आला आहे. ओट्समध्ये अँटी ऑक्सिडंटचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे संध्याकाळी नाश्त्यात तुम्ही ओट्सचा समावेश करू शकता. तुम्ही तांदळाचा किंवा रव्याच्या पिठाऐवजी ओट्स इडली खाऊ शकता हे चविष्ट असण्यासोबतच पोष्टीकदेखील आहे.

5. मखाना

मखानामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि इतर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मखान्याला पोषकतत्वांचा खजिना समजला जातो. संध्याकाळच्या स्नॅकमध्ये तुम्ही फ्राइड मखान्याचा समावेश करू शकता, जे आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits) ठरू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hydrate Foods : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही! डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Girls Fight Video: रिल्सच्या कमेंटवरून पोरींमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी हाणामारी करत भर रस्त्यातच भिडल्या, VIDEO व्हायरल

Jalgaon Crime : मजा मस्तीत दोन मित्रांमध्ये वाद; वादातून चाकूने केला वार

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'श्री' का लिहतात? हे फायदे वाचा

Balasaheb Thorat: कृपा करा; ३ लाखाच्या लीडची चर्चा करु नका... बाळासाहेब थोरातांचा ठाकरेंच्या उमेदवाराला सुचक सल्ला

SCROLL FOR NEXT