Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची चिंता रोजच पडते ? असा घ्या प्रोटीनयुक्त नाश्ता, पाहा रेसिपी

Morning Breakfast Ideas : आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात.
Morning Breakfast
Morning BreakfastSaam Tv

Breakfast Recipe : आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळचा नाश्ता करणे गरजेचे असते.तसेच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात.पण शाकाहारी लोक मांस खात नाहीत म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कोणते पदार्थ शिजवून खाऊ शकता.

नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, भाज्या,धान्य ,नट आणि फळे हा शाकाहारी आहार आहे या प्रकारचे आहार घेणारे लोक डेअरी उत्पादित पदार्थ, अंडी आणि जनावरांपासून उत्पन्न झालेले पदार्थ ज्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते ते घेत नाहीत.त्यासाठी आज आम्ही काही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी शाकाहारी लोकांसाठी घेऊन आलोय!

Morning Breakfast
Moog Dal Samosa Recipe : सकाळच्या नाश्त्यात बनवा क्रिस्पी मुग डाळ समोसा,जाणून घ्या रेसिपी

1. बेसन चिला

एक कप बेसन, १/४ कप बारीक चिरलेला कांदा,१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो (Tomato),१/४ कप चिरलेला कोथिंबीर,१ते २ टिस्पून बारीक चिरलेले आले,१/२टिस्पून कॅरेमल दाणे,२ ते ३ चिमूटभर हळद, लाला तिखट, पाणी आणि मीठ चवीनुसार.

Besan Chilla
Besan Chillacanva

कृती

  • एका मिक्सिंग बाऊलमध्ये बेसन घाला त्यात पाणी टाकून बेसन आणि पाण्याचे मिश्रण सतत ढवळत राहून फ्लोइंग कन्सिस्टन्सी होई पर्यंत राहू द्या.

  • तर सर्व भाज्या कॅरम दाणे कोथिंबीर आणि मीठ घालून परत एकदा पीठ फेटून बाजूला ठेवा.

  • गॅस मध्यम आचेवर पॅन ठेवून तेल गरम करा आणि त्यावर एक चमचा पीठ घाला

  • हलक्या हाताने पसरवा मंद आचेवर शिजवा एका बाजूने शिजवून झाल्यावर दुसऱ्या बाजूने शिजवा दोन्ही बाजू छान शिजवून घ्या आणि गरम गरम सर्व्ह करा.

Morning Breakfast
Paneer Lababdar Recipe : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर लबाबदार, पाहा रेसिपी

2. पोहे

२ कप पोहे,१/२ कप बारीक चिरलेला कांदा,१/२ टीस्पून जिरे,बारीक चिरलेली हिरवी मिरची,११/१२ टीस्पून शेंगदाणे,१/४ टीस्पून,१/४ टीस्पून हळद, लिंबाचा रस,२ टीस्पून साखर,मीठ चवीनुसार,बारीक चिरलेली कोथिंबीर,पोहे धुवून लगेच त्यातील पाणी काढून पोहे एका बाजूला ठेवा.

Poha
Pohacanva

कृती

  • गरम कढईत शेंगदाणे भाजून घ्या. त्याच कढईत मध्ये दोन चमचे तेल (Oil) घाला जिरे टाकून तडतडून घ्या.

  • आता सर्व भाज्या घालून दोन तीन मिनिटे परतून घ्या एक मिनिटे शिजू द्या यानंतर हळद आणि मग पोहे घालून मिक्स करा झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.

  • पोहे खूप कोरडे झाले आहे असे वाटल्यास थोडे पाणी शिंपडा कोथिंबीर आणि शेंगदाणे सजवून सर्व्ह करा.

3. चणा ऑम्लेट

१/४ कप बेसन,१/३ कप पाणी,मीठ चवीनुसार,१/४ कप आवडीच्या भाज्या,१ टेबलस्पून तेल.

Besan Omelet
Besan Omelet canva

कृती

  • एका मिक्सिंग बाऊल मध्ये बेसन आणि मीठ एकत्र करून नीट ढवळून घ्या.

  • गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत पाणी घाला आणि मिक्स करून घ्या आता कापलेल्या भाज्यांमध्ये ते मिश्रण घाला आणि पुन्हा मिक्स करा.

  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चवीनुसार मीठ घाला ऑम्लेट सारखे पसरवा आणि तीन-चार मिनिटे शिजवा.

  • शिजवून झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com