Foods That Help To Reduce Stress, What Foods Can Help Mental Health, Diet And Mental Health.
Foods That Help To Reduce Stress, What Foods Can Help Mental Health, Diet And Mental Health. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मानसिक ताण व डिप्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी 'डाएट' मध्ये या पदार्थांचे समावेश करा

कोमल दामुद्रे

मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार युवा पिढीत व वयोवृध्दांमध्ये मानसिक ताण व डिप्रेशनचा त्रास वाढत आहे. बिघडलेल्या जीवनशैलीनुसार व वाढत्या आजारामुळे त्याचा आपल्या शरीरावर व मनावर प्रभाव पडत असतो. (Foods That Help To Reduce Stress)

हे देखील पहा -

मानसिक ताण व डिप्रेशनच्या त्रासाबद्दल जनजागृती कमी प्रमाणात केली जाते. सध्या मानसिक ताण व डिप्रेशनमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. ही परिस्थिती युवा पिढीत दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत काही बदल केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.

खाण्यापिण्याच्या बदलांमुळे आपल्या आरोग्याला त्याचा उपयोग होतो. आपल्या दिवसभराच्या खाण्यापिण्याच्या पदार्थामुळे आपल्या मेंदूला शांत राहण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या पुरेशी झोप, भूक लागणे, वेदना किंवा मूड स्विंगला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते यामुळे आपल्याला डिप्रेशन व मानसिक ताणावर सहज मात करता येईल.

खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयीमुळे आपल्याला डिप्रेशन, ताण व चिंता याची लक्षणे कमी होण्यास मदत होईल. आपल्याला आहारात फळे (Fruit), भाज्या, कडधान्य व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांचे पुरेपुर सेवन केल्याने डिप्रेशनची समस्या कमी होऊ शकते. तसेच आहारात आपण दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवू शकतो. तळलेले अन्न व गोडाचे प्रमाण कमी करायला हवे. तणाव व चिंता कमी करण्यासाठी मद्यपान, कॅफिन व साखरेच्या (Sugar) पदार्थांचे सेवन टाळायला हवे. (What Foods Can Help Mental Health)

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

SCROLL FOR NEXT