irregular menstruation period  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अनियमित मासिक पाळीची समस्या रोखण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

पाळी आली नाही किंवा तिची अनियमिततेच्या तक्रारी आपल्यापैकी बऱ्याच जणींना असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजही मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज असल्याचे आपल्या पाहायला मिळते. पाळी आली नाही किंवा तिची अनियमिततेच्या तक्रारी आपल्यापैकी बऱ्याच जणींना असतात.

हे देखील पहा-

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचे चक्र हे २८ दिवसांचा कालावधीपर्यंत असते. परंतु कधीकधी ते अधिक दिवस वाढत जाते. आपल्या नेहमीच्या तारखेपेक्षा एखादा आठवडा पुढे गेला तर त्याला अनियमित असे म्हटले जाते. यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल तर आपण आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करायला हवा.

१. दालचिनीचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो परंतु, अनियमित मासिक पाळीसाठी दालचिनीचे सेवन फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळीही वाढते. जे मासिक पाळीसाठी उपयुक्त आहे.

२. आल्यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात आढळते. ज्याच्या मदतीने आपल्याला अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर काही प्रमाणात मात करता येते. आल्यापासून बनवलेला चहा आपण पिऊ शकतो. आल्याबरोबर गुळाचा चहा अधिक प्रभावीपणे काम करेल.

३. अनियमित मासिक पाळीसाठी अननस हा चांगला पर्याय आहे. त्यात ब्रोमेलेन एन्झाइम असते. त्यामुळे आपल्याला मासिक पाळी येऊ शकते. अननस खाल्ल्याने शरीरातील लाल आणि पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढते, जे रक्तप्रवाहासाठी उपयुक्त ठरते.

४. अनियमित मासिक पाळीत आपल्याला पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपई खाल्ल्याने इस्ट्रोजेनची पातळी नियंत्रित राहून गर्भाशयाचे कार्य सुरळीत राहाते. यामुळे वेळेवर पाळी येऊन वेदानाही कमी होतात.

५. कॉफीमध्ये कॅफिन आढळते त्यामुळे या दरम्यान कॉफीचे (Coffee) सेवन करावे. तसेच जास्त प्रमाणात मद्यपान करू नये. शरीरासाठी हानिकारक असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

SCROLL FOR NEXT