Monsoon food tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करा

पावसाळ्यात आपल्याला इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळा हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा ऋतू आहे. परंतु, पावसाळ्यात आपल्याला इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

हे देखील पहा-

पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य रोग संक्रमण करत असतात. आपण पावसाळ्यात काय खातो यावर बरेच काही अवलंबून असते. भाज्या, फळे आणि मसाले यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीतून आपण कोणते पदार्थ निवडायला हवे हे जाणून घेऊया.

१. पावसाळयात आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आल्याचे सेवन केल्यास पचनसंस्था सुधारते. सर्दी व तापापासुन आराम मिळते.

२. कारले चवीला अत्यंत कडू असले तरी पावसाळ्यात हे फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

३. लसणात असणाऱ्या गुणधर्मामुळे आपली चयापचय वाढते तसेच त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. त्यासाठी पावसाळ्यात लसणाचे सेवन करायला हवे.

४. पावसाळ्यात आपण रॉक मीठाचा वापर स्वयंपाकघरात करायला हवा. याचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढते.

५. मूग डाळीत प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे असून आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. पावसाळ्यात मूग डाळीचे सेवन फायदेशीर ठरते.

६. पावसाळ्यात (Monsoon) बऱ्याच जणांना पचनसंस्थेचा त्रास होतो अशावेळी आपण मधाचे सेवन करायला हवे. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.

७. घसा खवखवणे, फ्लू, खोकला आणि सर्दी टाळण्यासाठी हळद (turmeric) उपयुक्त ठरते. हळदीत असणाऱ्या गुणधर्मामुळे आपण त्याचे पावसाळ्यात सेवन केल्यास आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT