Migraine Problems
Migraine Problems Saam Tv
लाईफस्टाईल

Migraine Problems : मायग्रेनच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात, 'या' 5 गोष्टींचा समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Migraine Symptoms : मायग्रेनची समस्या खूप भरपूर तणाव घेतल्याने आणि हाय ब्लडप्रेशरमुळे उद्भवते. त्यासोबतच ज्या वेळेस मायग्रेनची समस्या उद्भवते तेव्हा डोक्यात कधी हलके दुखते तर कधी तीव्र वेदना होतात. त्यामुळे डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये.

अनेक तज्ज्ञांच्या मते मानसिक ताण (Stress), सर्दी, नशा, अशक्तपणा, बद्धकोष्टता, थकवा, नसांमध्ये तणाव या समस्यांमुळेही मायग्रेन होऊ शकतो. जर तुम्हालाही मायग्रेनचा त्रास होत असेल. तर या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा समावेश करा.

डार्क चॉकलेट खा -

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम हार्मोनल असंतुलनच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त असते. जर तुम्हाला ठराविक अंतराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डार्क चॉकलेट खायला हवे. शरीरावरील सूज कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट (Chocolate) फायदेशीर असते. तसेच मायग्रेनच्या समस्यांवर मात करण्यासाठी देखील तुम्ही चॉकलेट खाऊ शकता.

केळी खा -

केळांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे गुणधर्म असतात आणि पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. यामुळे मायग्रेनच्या समस्या असलेल्या रुग्णांनी केळीचे सेवन करणे फायदेशीर असते. तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारात केळीचा वापर करू शकता.

बदाम -

बदाम अनेक पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असते. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल. बदामामुळे स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. बदाममध्ये असलेल्या मॅग्नेशियमचे प्रमाण तणाव कमी करण्यासाठी सहकार्य करते. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

आवळा रस प्या -

आवळयाच्या रसामध्ये आवश्यक पोषक घटक आढळतात, जे मायग्रेनसाठी गरजेचे असते. त्यामुळे मायग्रेनच्या रुग्णांनी आवळा आणि कोरफडचा रस नियमितपणे सेवन केल्यास मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

सी फुड्स खाणे -

तुमच्या आहारात सी फुड्सचा समावेश करून तुम्ही मायग्रेनच्या समस्या दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोनदा ट्युना, सॅल्मन फिशसह सीफूड खावे लागते. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी- इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात, जे मायग्रेनमध्ये सहकार्य करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT