Kitchen door direction saam tv
लाईफस्टाईल

Kitchen door direction: किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घर बांधताना वास्तुशास्त्रातील हे नियम लक्षात ठेवा

Kitchen Vastu Shastra: घर बांधताना किचनच्या दरवाजाची दिशा कोणती असावी? वास्तुशास्त्रानुसार पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेला किचनचा दरवाजा असणे शुभ मानले जाते. जाणून घ्या किचनच्या दरवाजाची दिशा ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि काय काळजी घ्यावी.

Surabhi Jayashree Jagdish

घर बांधताना प्रत्येक खोलीची जागा आणि दिशा ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यात किचनचाही समावेश असतो. वास्तुशास्त्रानुसार, किचनला घरातील महत्त्वाची जागा मानलं जातं. कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केलं जातं.

किचनमध्ये गॅस, शेगडी आणि इतर सामान कुठे ठेवायचं याकडे अनेकजण लक्ष देतात. पण किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा, याचाही वास्तुशास्त्रात विचार केला जातो. तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा जुन्या किचनमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असाल, तर दरवाजाची दिशा ठरवताना काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.

किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असणं शुभ?

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञांच्या मते, किचनच्या दरवाजाची दिशा ठरवताना घराची संपूर्ण रचना आणि किचन नेमकं कुठे आहे, हे पाहणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, किचनचा दरवाजा पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला असणं शुभ मानलं जातं. पण प्रत्येक घराची रचना वेगळी असते. त्यामुळे केवळ दिशा पाहून निर्णय घेऊ नये.

पूर्व दिशेला किचनचा दरवाजा असणं चांगलं

वास्तूशास्त्रात पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. या दिशेला सकारात्मक ऊर्जेशी जोडलं जातं. त्यामुळे किचनचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर तो चांगला पर्याय मानला जातो. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी सूर्याचा प्रकाश किचनमध्ये येत असेल तर किचन अधिक मोकळे आणि उजळ दिसते.

उत्तर दिशेचा दरवाजाही ठरू शकतो चांगला पर्याय

वास्तुशास्त्रानुसार, किचनचा दरवाजा उत्तर दिशेला असणेही योग्य मानलं जातं. घराची रचना अशी असेल की किचनचा दरवाजा उत्तर दिशेला सहज करता येऊ शकतो, तर या दिशेचाही विचार करता येतो.

पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर काळजी करू नका!

काही घरांमध्ये जागा कमी असल्यामुळे किंवा घराच्या नकाशानुसार, किचनचा दरवाजा पश्चिम दिशेला ठेवावा लागतो. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, काही परिस्थितींमध्ये पश्चिम दिशेचा दरवाजाही योग्य मानला जातो. त्यामुळे किचनचा दरवाजा पश्चिम दिशेला असल्यास लगेच चिंता करण्याची गरज नाही. कारण किचनमध्ये इतर वस्तूंची मांडणी कशी केलीये हेही तितकेच महत्त्वाचं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील सर्व मैदाने आणि उद्याने महापालिकेच्याच ताब्यात राहणार

Bed Mattress Replace : बेडची गादी किती वर्षांनी बदलावी? अन्यथा तुमच्या त्रासाचं ठरेल कारण; कशी ओळखायची एक्सपायरी डेट?

धाराशिवमध्ये नोव्हेंबरमध्येच तलाव कोरडे; पीक जळालं, जमीनही भेगाळली,'साम'चा ग्राऊंड रिपोर्ट

Election: जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, भाजप मित्रपक्षांना किती जागा देणार? समोर आली महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, पण मागे हटता येईना! मंत्र्यांच्या कबुलीने खळबळ

SCROLL FOR NEXT