Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: किचनमध्ये वॉटर प्युरिफायर कोणत्या दिशेला लावावा? वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींच्या जवळ चुकूनही लावू नका

Water Purifier Vastu: किचनमध्ये वॉटर प्युरिफायर किंवा आरओ मशीन बसवण्याचा विचार करत आहात? वास्तुशास्त्रानुसार ईशान्य आणि उत्तर दिशा पाण्यासाठी योग्य मानली जाते. जाणून घ्या वॉटर प्युरिफायरची योग्य दिशा, कोणत्या दिशेला तो लावणं टाळावं आणि बसवताना कोणती काळजी घ्यावी.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल जवळपास प्रत्येक घरात पिण्याचं पाणी स्वच्छ करण्यासाठी आरओ (RO) किंवा वॉटर प्युरिफायर वापरला जातो. पण घरात या मशीनची जागा ठरवतानाही वास्तुशास्त्रातील काही गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार, घरातील पाणी आणि इतर वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात, याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हीही किचनमध्ये नवीन वॉटर प्युरिफायर बसवण्याचा विचार करत असाल तर तो कोणत्या दिशेला लावावा आणि कोणत्या दिशेला लावणं टाळावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

वास्तुशास्त्रात जलतत्त्व कोणत्या दिशेला मानलं जातं?

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा ही जलतत्त्वाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे घरात पाण्याशी संबंधित गोष्टी ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा योग्य मानली जाते. किचनमध्येही या दिशेला जागा उपलब्ध असेल तर तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा वॉटर प्युरिफायर ठेवता येतो.

वॉटर प्युरिफायर कोणत्या दिशेला लावावा?

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये वाटर प्युरिफायर लावण्यासाठी ईशान्य दिशा शुभ मानली जाते. या दिशेला जागा नसेल, तर उत्तर दिशा निवडण्याचा पर्याय आहे. पण वॉटर प्युरिफायर बसवताना केवळ वास्तुशास्त्राचा विचार करून चालणार नाही. मशीनला लागणारे विजेचे कनेक्शन, पाण्याची सोय, पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था आणि मशीनची दुरुस्ती किंवा साफसफाई करण्यासाठी पुरेशी जागा आहे का, हेही पाहणे गरजेचं आहे.

किचनमधील नळ कोणत्या दिशेला असावा?

वास्तुशास्त्रानुसार, किचनमधील सिंक आणि पाण्याचा नळ उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणं योग्य मानलं जातं. या दोन्ही दिशा जलतत्त्वाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. किचनमध्ये गॅस शेगडी ही अग्नितत्त्वाचं तर सिंक हे जलतत्त्वाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या अगदी जवळ न ठेवता त्यांच्यामध्ये योग्य अंतर असावं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलंय.

कोणत्या दिशेला वाटर प्युरिफायर लावणं टाळावं?

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय दिशा ही अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला पाण्याशी संबंधित वस्तू ठेवणं टाळावं, असं सांगितलं जातं. गॅस शेगडी किंवा स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर उपकरणांच्या अगदी जवळ वॉटर प्युरिफायर लावू नये, असं मानलं जातं.

वॉटर प्युरिफायर बसवताना या गोष्टीही लक्षात ठेवा

वाटर प्युरिफायर बसवण्यासाठी जागा निवडताना स्वच्छता, सुरक्षित विजेचं कनेक्शन आणि पाणी बाहेर जाण्याची योग्य व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मशीनची वेळोवेळी साफसफाई आणि देखभाल करणंही महत्त्वाचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : ट्रेनचे कन्फर्म तिकीट असूनही प्रवास शक्य नाही? मग दुसऱ्या व्यक्तीला करता येईल का प्रवास ? जाणून घ्या रेल्वेचे नियम

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी रवाना होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली भेट

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, आव्हाड राज्याच्या मंत्रिमंडळात? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला?

दुबईमध्ये भव्य दिवाळी सोहळा, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजारो मराठी रसिकांची उपस्थिती; अवधूत गुप्तेंच्या गाण्यांची मैफील रंगली

Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT