Women's Fashion  Saam Tv
लाईफस्टाईल

Women's Fashion : 2023 च्या फॅशन ट्रेंडमध्ये महिलांसाठी 'या' जीन्स ठरतील फिट व आकर्षक !

आजच्या या मॉडर्न युगात प्रतेकजन आपापल्या परीने हवी तशी फॅशन करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Women's Fashion : आजच्या या मॉडर्न युगात प्रतेकजन आपापल्या परीने हवी तशी फॅशन करतो. अशातच जिंस परिदान करायला सगळ्यांनाच आवडते. मुलगा असो किंवा मुलगी, सगळ्यांकडे जींसचं कलेक्शन असतं.

अशातच बाजारत एक नवीन डेनिम प्रकारची जिन्स (Jeans) आली आहे. ही जिन्स सध्या खूपच चर्चेत आहे. तरुणींना वेड लावणारी जिन्स आता बाजारामध्ये (Market) विक्रीसाठी आली आहे. ही जिन्स फारच स्टायलिश आणि आकर्षक आहे. त्यामुळे कोणालाही ती जिन्स घेण्याचा मोह आवरणार नाही.

प्रत्येकाच्या कपटामध्ये जिन्स असतातच. पण आता तुम्हाला तुमच्या कलेक्शन मध्ये या जींसला सहभागी करून घ्यायला हवं. कारण ही जिन्स इतर जींसपेक्षा थोडी वेगळी आहे. जिन्स शक्यतो अंगाला टाईट असते. पण ही नविन आणि चर्चेत असलेली जिन्स टाईट नसून लूज आहे.

या जिन्समध्ये प्लेटेड ट्राउझर, ड्रामेटीक वाइल्ड-लेग्ज आणि फॉर्मफिटिंग बुट कट्स सुध्दा लोकप्रिय होणार आहे. ज्यामध्ये 70 ,80 आणि 90च्या दशकासाठी आकर्षक सिल्हुट आहेत. प्रत्येक वर्षी कपड्यांमध्ये एक नवीन ट्रेंड (Trend) येत असतो. त्याचप्रमाणे लोक सुद्धा आपला पेहराव बदलत असतात.

या सीजन मध्ये, तुम्ही अल्ट्रा वाइड-लेग जीन्सला तुमच्या कलेक्शन मधेय नक्किच शामील करून घ्या. ही जिन्स घातल्यावर तुमच्या पायातील बुट अजिबात दिसणारं नाही. या जिन्सची खासियत म्हणजे हि जिन्स जो कोणी घालेल त्याला आपण खूप स्टायलिश आहोत असं वाटेल.

त्यानंतर येते बुटकट फ्लेअर्स हि जिन्स सुध्दा खुपचं आकर्षक आणि स्टायलिश आहे. ही जिन्स अमिताभ बच्चन यांच्या जिन्स सारखी वाटते. सत्तरच्या दशकातील या थ्रोबॅक स्टाईलमध्ये गुडघ्यापासून ते खाली पायापर्यंत हलकीशी फ्लेयर झालेली असते.

म्हणजेच बॉटमला पसरलेली असते. त्यानंतर येते टेपर्ड-लेग जिन्स. ही जिन्स किंचित फुग्यसारखी फुललेली दिसते. या जिन्समध्ये तुम्हाला थोडेसे धनुष्यमानाच्या आकाराचे पाय पाहायला मिळतील. ही जिन्स सुद्धा खूप आकर्षक दिसते. नंतर येते पॅचवर्क जिन्स पॅचवर्क म्हणजे डेनिम जिन्सवर दुसऱ्या वस्तूंचे पॅच असतात.

ही जिन्स घातल्यावर देखिल फार छान वाटते. प्रत्येकाने काळानुसार बदलणे गरजेचे आहे. जेव्हा आपण चांगले कपडे घालतो तेव्हा आपण सुद्धा एका पॉझिटिव्ह माइंडने प्रत्येक गोष्टींचा विचार करत असतो. त्यामुळे नेहमी टापटीप राहणे फार गरजेचे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

टेस्लाच्या स्क्रीनवर दिसतात भुतं? टेस्लामध्ये खरंच रात्री भुतं दिसतात?

Heart Attack: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना सर्वाधिक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते? अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

SCROLL FOR NEXT