Marriage Saam Tv
लाईफस्टाईल

Inter-cast Marriage Scheme : आंतरजातीय विवाह केल्यास सरकार देणार ३ लाख रुपये, असा करा अर्ज

या योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांनी हिंदू विवाह कायदा १९५५ किंवा विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Inter-cast Marriage Scheme : महाराष्ट्रात एखाद्या मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीतील विवाह (Marriage) केल्यास, त्याला आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ३ लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांनी हिंदू विवाह कायदा १९५५ (Law) किंवा विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे. याशिवाय, योजनेच्या लाभासाठी, तुम्हाला प्रथम राज्य सरकारने सुरू केलेल्या जातीय विवाह योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. राज्यातील आंतरजातीय विवाहाबाबत भेदभाव संपवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

आंतरजातीय विवाह योजना वैशिष्ट्ये -

योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल

योजनेंतर्गत ५०,००० रुपये सरकारकडून आणि २.५० लाख रुपये म्हणजेच ३ लाख रुपये डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडून दिले जातात.

ही रक्कम फक्त राज्यातील अशा तरुणांना किंवा मुलींना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील तरुण आणि मुलीशी लग्न केले आहे.

या योजनेत आता वार्षिक उत्पन्न बंद करण्यात आले आहे. आता राज्यातील जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रासाठी पात्रता -

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा असणे अनिवार्य आहे.

योजनेच्या लाभासाठी मुलगा आणि मुलगी यांचे वय २१ वर्षे आणि १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

विवाहित जोडप्यांपैकी एक अनुसूचित जाती किंवा जमातीचे असेल तेव्हाच योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्याचे कोर्ट मॅरेज अनिवार्य आहे.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र

जातीचा दाखला, वयाचा दाखला

विवाह प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक पासबुक

मोबाईल नंबर

आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा करावा -

यासाठी अर्जदाराला प्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. येथे तुम्हाला महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेचा पर्याय दिसेल.

तुम्ही या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अर्जाचा फॉर्म नवीन पेजवर दिसेल.

येथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरू शकता जसे की लग्नाची तारीख, आधार कार्ड क्रमांक.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट वर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण योजनेत ऑनलाइन नोंदणी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT