Onam 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Onam 2023 : कधी आहे ओणम? भगवान विष्णूशी काय आहे संबंध? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Onam 2023 Date : भारताला सणांचा देश म्हणून ओळखले जाते म्हटले जाते. येथे दररोज एक ना एक सण साजरा केला जातो. तसेच भारताच्या प्रत्येक प्रदेशात त्यांच्या पद्धतीने सण साजरे केले जातात. तसाच आता सुरू असलेला दक्षिण भारतीय मुख्य सण पाहूयात. दक्षिण भारतात दहा दिवसांचा ओणम सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

महाबली आणि वामन अवतार घेतलेल्या भगवान विष्णूच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये, ओणम हा सण 20 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत साजरा केला जाईल. ओणम हा सण मल्याळम कॅलेंडरवर (Calender) आधारित चिंगम महिन्यात येतो. विशेषत: केरळमध्ये या सणाची खूप धूम असते.

पंचांगानुसार, 29 ऑगस्ट 2023 रोजी ओणम साजरा केला जाईल. 29 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 02:43 वाजता तिरुवोणम नक्षत्र सुरू होईल आणि हे नक्षत्र त्याच दिवशी रात्री 11:50 वाजता संपेल. हिंदू कॅलेंडरच्या आधारे पाहिल्यास हा दिवस सावन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असेल.

ओणम सणाचे महत्त्व

ओणम हा सण (Festival) राक्षस राजा महाबलीच्या पाताळातून पृथ्वीपर्यंतच्या वार्षिक प्रवासाला समर्पित आहे. असे मानले जाते की तिरुवोनमच्या दिवशी, राक्षस राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी प्रत्येक मल्याळी घराला भेट देतो.

ओणम हा सण भगवान विष्णूचा वामन अवतार म्हणूनही साजरा (Celebrate) केला जातो. असे मानले जाते की जे ओणमच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात, त्यांच्या घरावर दुःखाचे ढग कधीच फिरत नाहीत, सुख, संपत्ती आणि आशीर्वाद कायम राहतात.

ओणम कसा साजरा केला जातो?

नवीन पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी केरळमध्ये प्रसिद्ध स्नेक बोट रेस आणि कथकली नृत्याचे आयोजन केले जाते. आनंद, उत्साह आणि परंपरांनी भरलेला हा उत्सव 10 दिवस चालतो. पहिला दिवस अथम, दुसरा चित्रा, तिसरा आणि चौथा विसकम, पाचवा अनिजम, सहावा थिक्रेता, सातवा मूलम, आठवा पूरदम, नववा उथिरादम आणि दहावा तिरुवोनम म्हणून ओळखला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT