Immunity Booster kadha, Medicinal plant, Ayurvedic drink
Immunity Booster kadha, Medicinal plant, Ayurvedic drink  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Monsoon Care tips : पावसाळ्यात हा काढा प्यायल्याने अनेक संसर्गजन्य आजारांपासून होईल बचाव

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा ऋतूमध्ये अनेक संसर्गजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते. बाहेरचे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

हे देखील पहा -

पावसाळ्यात असंख्य संसर्ग होतात. सर्दी, खोकला, फ्लू, विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि बरेच काही. म्हणूनच, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अधिक गरजेचे आहे. पावसाळ्यात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काढा पिण्याची आवश्यकता असते. जाणून घेऊया त्याबद्दल.

१. तुळशी आणि हळदी हे दोन्ही आयुर्वेदिक घटक असून आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. याचा काढा बनवताना आपल्याला तुळशीची पाने, हळद पावडर, मध किंवा गूळ याचा समावेश बनवून आपण याचे सेवन करु शकतो.

२. आपल्या स्वयंपाकघरात तुळशी, आले, हळद (Turmeric), ज्येष्ठमध, दालचिनी, काळी मिरी आणि लवंगा यांसारख्या सामान्य औषधी वनस्पती आणि मसाले सहज आढळतात. आपण पावसात भिजल्यानंतर या काढ्याचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतील.

३. दालचिनी, काळ्या चहाची पाने, लवंग याचा काढा आपण बनवू शकतो. लवंग व दालचिनीत अनेक उष्ण घटक असतात. ज्यामुळे आपला सर्दी व फ्लूसारख्या आजारांपासून बचाव होईल.

४. ज्येष्ठमध हे प्राचीन औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. याशिवाय, त्यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल जास्त असल्याने सर्दी, खोकला आणि इतर हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.

५. गुळवेल ही भारतीय औषधी वनस्पती (Plant) असून याचा वापर युगानुयुगे सुरू आहे. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला, ताप, बध्दकोष्ठता, दमा व संधिवात सारख्या आजारांवर मात करता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT